अहो ….कुणी अंडी देता का अंडी : शिक्षकांना अंडी गोळा करण्याचे शिक्षण विभागाचे तुघलकी आदेश

0
मुुंबई : जागतीक अंडे दिनानिमित्ताने राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना चक्क अंडी गोळा करण्याचा तुघलकी आदेश काढला. त्यामुळे शिक्षकांना वर्गात मुलांना शिकवणे सोडून आता दारोदार अंडी गोळा करावी लागणार आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण व जिल्हा रुग्णालये आदी ठिकाणी तब्बल ३० लाख अंडी वाटण्याचे उद्दिष्ट कृषी, पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, महिला व बाल कल्याण विभागाने ठेवले आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने आदेश काढले असून शिक्षकांना लोकसहभागातून अंडी गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोषण आहारात अंड्याचे महत्त्व अबाधित आहे. याबाबज जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी ‘जागतिक अंडे दिन’ साजरा केला जातो. त्याअनुसार यंदा पशुसंवर्धन विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदा या आयोजनात शालेय शिक्षण विभागाचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, शाळांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणार अंडी कशी उपलब्ध करून द्यायची, असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर आहे. दुसरीकडे शहरातील शाळांमध्ये जे महिला बचत गट शालेय पोषण आहार पुरवितात त्यांतील महिला गुरुवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत अनभिज्ञच होत्या.

लोकांकडून अंडी गोळा करा

ग्रामीण शाळांतील एकूण पटसंख्येपैकी किती विद्यार्थी अंडी खातात, त्या प्रमाणात ती उपलब्ध करून घेण्याचे आदेश गुरुवारी दुपारी देण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांशी समन्वय साधावा.

अधिकाधिक लोकसहभाग मिळवून अंडी खाणाऱ्या १०० टक्के विद्यार्थ्यांना लाभ द्यावा व त्याचा अहवाल दुसऱ्या दिवशी केंद्र प्रमुखांकडे सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

*