शेतकर्‍यांच्या उद्रेकाला सरकारच जबाबदार -शरद पवार

0
मुंबई / शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकर्‍यांचा उद्रेक झाला आणि याला राज्य सरकारचं जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलाय.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शेतकर्‍यांच्या संपाची पाठराखण केली.
बरेच दिवस उलटल्यानंतर सुद्धा कोणताही निर्णय न झाल्यामुळे अखेर लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले असं मत पवारांनी व्यक्त केलं.

तसंच शेतकरी रस्त्यावर उतरणार याची पूर्वकल्पना दिली गेली होती. तरीही राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने कोणतेही निर्णय घेतले नाही.

आता त्याचा उद्रेक आज पाहण्यास मिळतोय. या उद्रेकासाठी शेतकर्‍यांना आणि चळवळीमध्ये काम करणार्‍यांना दोष देऊन चालणार नाही.

या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार्‍यांकडे याची जबाबदारी जाते असं स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

LEAVE A REPLY

*