संपामुळे होणारे नुकसान शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपेक्षा कमीच-रघुनाथदादा

0
सांगली / शेतकरी संपाचे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी जोरदार समर्थन केले आहे. संप हा शेतकर्‍यांच्या फायद्याचा ठरणार असून संपामुळे शेतकर्‍याचे जे नुकसान होत आहे. ते शेतकरी आत्महत्यांपेक्षा कमीच आहे, अशी प्रतिक्रिया रघुनाथ पाटील यांनी दिली आहे.
या आंदोलनात होणार्‍या नासाडीवर बोलताना आज शेतमालाला भाव न देता शेतीमालाची नासाडी सुरूच आहे. सरकारकडे तज्ज्ञाचे जे शेतीविषयक अहवाल आहेत त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, त्याशिवाय माघार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
देशातील शेतकर्‍याला फायदा होत नसल्याने आज शेतकरी संपावर गेला आहे. उत्पादन खर्च निघत नाही त्यामुळे शेती तोट्यात जात आहे आणि हा तोटा आणखी वाढत निघाला असून याला कायम स्वरूपी मार्ग काढल्याशिवाय पर्याय नसल्याने हा संप थांबणार नाही.
त्यामुळे या संपामुळे शेतकर्‍यांना फायदा होणार असल्याचे मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केले आहे.

संपामध्ये होणार्‍या नुकसानीबाबत बोलताना पाटील म्हणाले की, गेल्या दोन वर्षात दुष्काळ, पाऊस आणि गारपीट यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होतच आहे. तर दुसरीकडे ज्यावेळी अधिक पाऊस पडतो त्यावेळी शेतीमालाचे अधिक उत्पादन होते.

त्यावेळी सरकारी धोरणामुळे दर मिळत नाही तर नुकसान सततचे आहे. त्यामुळे पिकले तेव्हा लुटले अशी स्थिती राहिली आहे.

या आंदोलनामध्ये शेतीमालाचे नुकसान होणार नाही, दूध पोरांना आणि भाजी गुरांना अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली आहे. त्यामुळे नुकसान नाही असे यावेळी रघुनाथ पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

तर या आंदोलनामुळे शेतकर्‍यांचे नुकसान फार होणार नाही शेतकरी आत्महत्यापेक्षा कमी असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे हि मुख्य मागणी असून स्वामीनाथन आयोग, शरद जोशी, टाटा इन्स्टिट्यूट आणि सरकारी अहवाल जे आहेत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, तरच संप मागे घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

*