बैलगाडी मोर्चा काढत राष्ट्रवादीचा शेतकर्‍यांच्या संपाला पाठिंबा

0
भुसावळ / कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी राज्यात आजपासून संप पुकारला आहे.
दरम्यान या संपाला जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग—ेसनेही पाठिंबा देत भुसावळ येथे बैलगाडी मोर्चा काढून आंदोलन केले.
राष्ट्रवादी काँग—ेसचे युवक प्रदेशाध्यक्ष संग—ाम कोते-पाटील यांच्या उपस्थितीत भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करावा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शेतकर्‍यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

यावेळी माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर तसेच राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

LEAVE A REPLY

*