Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव नवरात्री

# नवरात्री विशेष : स्त्री शक्तीचा जागर # स्त्रीशक्तीच्या रूपातील मनुष्यबळ विकसीत करण्याची गरज

Share
नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. स्त्री हे आदिशक्तीचे रूप आहे. परमेश्वराने स्त्रीला सोशिकतेचे आणि सहनशीलतेचे सुंदर वरदान दिले आहे. त्यामुळे आयुष्यात कितीही कसोटीचे, दु:खाचे प्रसंग आले तरी चटकन सावरणारी, खंबीरपणे उभी राहणारी ‘स्त्री’ च असते. ती स्वत: बरोबर इतरांचेही जीवन समृध्द करीत असते.

बहिणाबाई म्हणतात ‘हास हास माझ्या जीवा अस संसारात हासं, इडापिड संकटांच्या तोंडावर्‍हे काय फासं’
संसाराला हातभार लागावा म्हणून नोकरी करणारी, मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून त्यांना शिस्त, संस्काराचे धडे देणारी, घर संसार, पती, मुले हाच धर्म मानणारी, रितीरीवाज- सणवार, यातच सुख शोधणारी. अशा विविध रूपात स्त्रीचे दर्शन घडते. महिलांना आदिशक्तीचे रूप मानून पूजनीय मानले जाते तर दुसरीकडे मात्र त्यांना दुय्यम स्थान दिले जाते.

महिला सबलीकरण करतांना समाजात घडणार्‍या स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाप्रथा, असमानता, लैंर्गिक अत्याचार इत्यादींचा नाश करणे गरजेचे आहे. महिला सबलीकरण म्हणजे त्यांच्या नैसर्गिक गुणधर्म, क्षमता विचार यांच्यासह समानतेने वागविणे होय. स्त्रीशक्तीच्या रूपात देशात असलेले मनुष्यबळ जर विकसित केले तर समाजात सुराज्य दिसेल.

– सौ.हर्षदा हर्षद महाजन,मु.पो.न्हावी,ता. यावल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!