बॉलिवूड मि.अँड मिस इंडिया २०१७ स्पर्धेसाठी खान्देशातून ३१ जणाची निवड

0
जळगाव :  येथील आय एन आय एफ डी या संस्थेंच्या सहकार्याने दिल्ली येथील स्टूडिओ १९ फिल्म्स  यांच्या मार्फत बॉलिवूड मी. अँड मिस २०१७ या  स्पर्धेसाठी निवड व चाचणी घेण्यात आली ह्या स्पर्धेत ८० मुला-मुलींनी सहभाग नोंदविला त्यातून  ३१ जणांची  निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली.

यात २१ मुले व १० मुलींचा समावेश आहे. ह्या स्पर्धेत ज्यांची निवड झाली त्या सर्व मुलांना बॉलीवुड टिकिट देण्यात आले.
अंतिम फेरी  २४ जून रोजी पंचताराकित  हॉटेल क्राउन प्लाझा, नवी दिल्ली येथे होणार आहे.

मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्या दुष्टिने मुलांनी पुढील स्पर्धेसाठी मेहनत घेण्यास सुरवात केली आहे. अंतिम फेरीच्या निवड  चाचणीसाठी ज्यूरी म्हणून बॉलीवुड कलाकार अरबाज खान, सना खान, रजनीश दुग्गल,विशाल पांडे, यश अलवंत हे असणार आहेत.

या स्पर्धेत फॅशन डिझाईन, अभिनय आणि मॉडेलिंग यासाठी चाचणी घेण्यात आली . ज्युरी  म्हणून चित्रपट दिग्दर्शक विशाल दुग्गल ,फॅशन डिझाइनर राशी वर्मा आणि आय एन आय एफ डी या संस्थेंच्या संचालिका संगीता  पाटील यांनी काम पहिले .

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आय एन आय एफ डी या संस्थेतील लक्ष्मी मलबारी, सुप्रिया जाधव,काजल महाजन,जयश्री मोरे, दीपाली काळे,अंजुलता सोनी,यांचे अनमोल सहकार्य मिळाले

LEAVE A REPLY

*