शेकर्‍यांना सरसकट कर्ज माफी द्या : भुसावळ प्रांतअधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे मोर्चा

0
 भुसावळ |  शेतकर्‍यांना सरसकट कर्ज माफी देेण्यासह विविध  मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे गुरुवारी सकाळी ११.३० वाजता जामनेर रोडवरील नवशक्ती आर्केडपासून प्रांतअधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला़
 यावेळी प्रांत अधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळणे, शेतकर्‍यांना विजबील माफ करणे, ज्या  शेतकर्‍यांनी विजेसाठी डिमांडनोट भरतुीे आहे. त्यांना त्वरीत विज कनेक्शन देने.
मागेल त्या  शेतकर्‍याला वीज कनेक्शन देणे. भुसावळ एमआयडीसीमध्ये त्वरीत डेव्हलपमेंट करणे. मध्य रेल्वेच्या तीसर्‍या व चौथ्या  लाईनसाठी संपादीत करण्यात  आलेल्या शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला तात्काळ देण्यात यावा. आणि कुटुंबातील एका व्यक्तीस  मध्यरेवेच्या सेवेत कायम सामावून घेणे.
कुर्‍हा-बोदवड शिवारात वन्य प्राणयांपासून शेती पीकांसाठी संरक्षण मिळणे या मागण्यांचा समावेश होता.
 मोर्चेकर्‍यांच्या अग्रभागी ढोल-ताशे व गोंधळी सहभागी झाले तसेच त्यामागे पाच बैलगाड्यांवर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शेतकरी कजर्माफीसह राज्य शासनाच्या भोंगळ कारभाराविषयी घोषणाबाजी करत पदाधिकारी प्रांताधिकारी कार्यालयाजवळ दाखल होत धडकल़े प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े
यावेळी मोर्चात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष संजय कोते-पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, ऍड रवींद्र भैय्या पाटील, तालुकाध्यक्ष व  जि.प. सदस्य रवींद्र पाटील, प्रदेश सदस्य विजय चौधरी, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, युवक जिल्हाध्यक्ष योगेश देसले, शहराध्यक्ष शेख पापा शेख कालू, रावेर तालुकाध्यक्ष सोपान पाटील, माजी सभापती राजेंद्र चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोर्चात सहभागी झाल़े होते.

LEAVE A REPLY

*