सात महिन्याच्या बाळाला विहिरीबाहेर ठेवून मातेची विहिरीत आत्महत्या

0
पारोळा : पारोळा चोरवड रस्त्यावर एका अज्ञात महिलेने सात महिन्याचे बाळ विहिरी बाहेर ठेवून विहिरीत उडी मारून आत्महत्या  केली. पूजा समाधान पवार वय 23 रा देवगाव ता पारोळा असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

श्री बालाजी नगर चोरवड रस्त्यावरील पुंजू मराठे पहेलवान यांच्या शेतातील परिसरात ही महिला लहान बाळाला काखेत घेऊन फिरत असताना मराठे यांच्या सालदाराने त्या महिलेस विचारणा केली असता तिने मी देवगावची असून मी जवळील तांबे नगर येथे रहात असल्याचे सांगितले.

त्यानंतर सालदार आपले करत असताना तिने तिच्या सात महिन्याच्या बाळाला विहिरीजवळ ठेवून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

बाळ जोर जोराने रडू लागल्याने सालदार विहिरीकडे आल्यानंतर त्याने विहिरीत पाहिले असता सदर महिला ही पाण्यात बुडून मरण पावलेली होती.

याबाबत पारोळा पो स्टे ला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*