किनगाव येथे आंदोलनकर्त्या ५२ शेतकर्‍यांना अटक व सुटका

0
यावल | प्रतिनिधी :  कर्जमाफी, कृषिमालाला योग्य भाव मिळणे, सातबारा कोरा करणे, वीजबील माफ करणे, खतांवरील अनुदान वाढवणे यासारख्या विविध मागण्यांसाठी यावल तालुक्यातील किनगाव येथे आंदोलन करणार्‍या ५२ शेतकर्‍यांना अटक करण्यात आली.

आपल्या रास्त मागण्यांसाठी आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास किनगावच्या शेतकर्‍यांनी शेतकरी संघटनेचे नेते कडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली किनगाव यावल  जळगाव चौफुलीवर आंदोलन केले.

विविध घोषणां त्यांनी दिल्यात. यावेळी पोलिसांनी ५२ शेतकर्‍यांना अटक केली. अटकेची कार्यवाही पूर्ण करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

LEAVE A REPLY

*