चाळीसगावात वादळी पाऊस : अंगावर भिंत पडून महिलेचा मृत्यू

0
चाळीसगाव / तालुक्यात बुधवारी काही ठिकाणी वादळी पाऊस झाला.हातले येथे एका घराची भिंत दुसर्‍या घरावर पडून भिंतीखाली 73 वर्षीय वृध्द दाबल्या गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चाळीसगाव परिसरात सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होवून सुसाट्यांचा वारा सुटला.यात तालुक्यातील हातले येथे जोरांचे वारा- वादळ सुटल्याने एका घराची भिंत दुसर्‍या घरावर पडल्याने त्या घराची भित पडून त्याखाली पर्वताबाई बुटा खैर (वय73) यांचा जागीच मृत्यू झाला.

तर घरातील अंकुश बुटा खैर, वाल्हाबाई अंकुश खैर व ऋषीकेश व अंकुश यांना गंभीर मार लागला आहे.जखमींना तात्काळ चाळीसगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.घटनास्थळी तात्काळ पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी दाखल झाले.

या वादळामुळे काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.वादळी वार्‍यामुळे व पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले.

तहसीलदार के.बी. देवरे यांनी मंडळ अधिकारी व तलाठ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.

LEAVE A REPLY

*