पणन महासंघाच्या संचालकपदी संजय पवार बिनविरोध

0
जळगाव / महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक महासंघ अर्थात पणन महासंघाच्या निवडणुकीत जळगाव विभागातून संजय मुरलीधर पवार हे संचालक म्हणून बिनविरोध निश्चित झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक महासंघ अर्थात पणन महासंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
11 विभागातून या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. जळगाव विभागातून येवल्याच्या उषा शिंदे, भडगावचे प्रताप हरी पाटील, अनुसूचित जाती जमातीतून आ.संजय सावकारे, अ‍ॅड.रविंद्रभैय्या पाटील व संजय पवार असे उमेदवार होते.

जळगाव, धुळे, नंदूरबार अशा जळगाव विभागातून जिल्हा बँकेचे संचालक संजय मुरलीधर पवार हे आता पणन महासंघाच्या संचालकपदी बिनविरोध निश्चित झाले आहेत.

LEAVE A REPLY

*