गौरी लंकेशच्या हत्येप्रकरणी पहिला संशयीत अटकेत

0
मुंबई :  ज्येष्ट पत्रकार व समांजसेविका गौरी लंकेश यांच्या हत्याप्रक़रणातील पहिल्या संशयीतास एसआयटीने अटक केली आहे.

लंकेश यांच्या हत्येनंतर तब्बल पाच महिन्यांनी ही पहिली अटक करण्यात आली आहे.

के.टी.नवीनकुमार ( वय ३७) असे संशयीताचे नाव आहे. तो कर्नाटकधील मांड्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. हिंदु युवा सेना या संघटनेचा संस्थापक असून तो अवैधरित्या बंदुकांचे कार्टीज विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी सापाळा रचून त्याला अटक केली असता त्याच्याकडून ३२ एमएमची १५ कार्टिज जप्त केले आहे. त्याची चौकशी करून अजून आरोपींना अटक करण्यात यश येणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*