धरणगावात शिवसेनेचा रास्तारोको

0
धरणगाव  / कर्जामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या हतबलतेमुळेच तो आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. शेतकरी कर्जमुक्त व्हावा, शेतकर्‍यांना मासिक तिन हजार रूपये वेतन शासनाने द्यावे जिल्हा बँकेने पीक कर्जाची रक्कम एकरकमी द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी शहर व तालुका शिवसेनेकडून आज जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष सलिम पटेल, तालुकाप्रमुख गजानन पाटील, शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. असंख्य शिवसैनिक रस्त्यावर उतरल्यामुळे वाहतुक विस्कळीत झाली होती.

धरणगाव तालुक्यात आज पासून शिवसेनेचा भगवा सप्ताह सुरू आहे. या सप्ताह निमित्त पहिल्याच दिवशी शिवसेनेकडून मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजीत करण्यात आले होते. शिबिर सुरू झाल्यानंतर असंख्य शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रास्तारोको आंदोलन सुरू केले.

याप्रसंगी बोलतांना शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी सरकारवर सडकून टिका केली. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी सुखी राहिला तरच जग सुखी राहु शकेल आणि शेतकर्‍याला सुखी करायचे असेल तर कर्जमाफी शिवाय पर्याय नसल्याचे सांगितले.

धरणगाव येथील एटीएममध्ये नोटा उपलब्ध करून द्याव्यात, पशुवैद्यकिय रूग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टराची नियुक्ती करण्यात यावी, वारंवार खंडीत होणारा विज पुरवठा सुरूळीत करावा, दुरूस्तीची कामे एकाच वेळी करावीत विज पुरवठा खंडीत करणार असाल तर याची माहिती नागरिकांना आधी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

 

LEAVE A REPLY

*