Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

युतीसाठी शिवसेनेपुढे झुकणार नाही : भाजपाध्यक्ष शहा यांचा आक्रमक पवित्रा

Share

नवी दिल्ली ।  वृत्तसंस्था : राजस्थानसह पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपने मित्रपक्षांची मनधरणी सुरु केल्याच्या बातम्या येत आहेत. बिहारमध्ये जदयु आणि रामविलास पासवान यांच्या मनासारखे लोकसभा जागांचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती व्हावी म्हणून शिवसेनेविरोधात काही बोलू नका, असे आपल्या नेत्यांना बजावणार्‍या पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. युतीसाठी शिवसेनेपुढे झुकणार नाही, युतीसाठी आम्ही काहीही गमावण्याच्या अथवा कशावरही पाणी सोडण्याच्या मनस्थितीत नाही, अशा स्पष्ट शब्दांत शहा यांनी युतीविषयीची भूमिका स्पष्ट केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सदनात पार पडली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेसोबतच्या युतीबद्दलची भूमिका मोजक्या, पण परखड शब्दांत मांडली. काहीही गमावून महाराष्ट्रात युती होणार नाही, हेही शहा यांनी खासदारांच्या मनावर बिंबवले.

युतीबाबत शिवसेनेच्या प्रतिसादाची आम्ही शेवटपर्यंत वाट आम्ही पाहू. मात्र युतीसाठी शिवसेनेपुढे झुकणार नाही, असे शहा यांनी ठणकावले. महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवण्याची भाजपची तयारी आहे, असे सांगून निवडणुकांच्या तयारीला लागा, असे आदेशही शहा यांनी दिले आहेत.

या बैठकीला नारायण राणे देखील हजर होते. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे काय होणार हा प्रश्न अद्यापही कायम आहे. लोकसभा निवडणुकांसाठी आणि त्यापाठोपाठ होणार्‍या विधानसभा निवडणुकांसाठी युती होणार की नाही? हा पेच कायम आहे. पंढरपूरला झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी युतीचा निर्णय जनताच घेईल असे म्हटले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमच्यासोबत येईल कारण आम्ही आणि ते समविचारी पक्ष आहोत असे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या विविध मुलाखतींमध्ये म्हटले आहे.

अशात आता दिल्लीत झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी महाराष्ट्रातील सर्व जागा लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच शिवसेनेच्या प्रतिसादाची वाट बघू असेही म्हटले आहे. त्यामुळे युती होणार की नाही हा पेच सध्या तरी कायम आहे.

सर्व जागा लढवण्यास सज्ज राहा!

शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतीही चर्चा न करता सर्व जागांवर लढण्याची तयारी करावी, असे आदेश भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रातील खासदारांना बैठकीत दिले आहेत. मतदारसंघात जा आणि मतदारांना जास्तीत जास्त वेळ द्या, अशाही सूचना त्यांनी खासदारांना केल्या आहेत. बैठकीत महाराष्ट्रातील सर्व खासदारांचा लोकसभेतील आणि लोकसभा मतदारसंघांतील आढावा घेतला. खासदारांनी मतदारसंघातील अडचणींबाबत सूचना केल्या.

[button color=”” size=”” type=”round” target=”” link=””]पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत युतीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही,
– रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष[/button]

[button color=”” size=”” type=”round” target=”” link=””]युतीबाबत महाराष्ट्रातच चर्चा होईल, तिही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात.
– अरविंद सावंत, शिवसेना खासदार[/button]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!