दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक विस्कळीत

0
रत्नागिरी  / मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. बावनदी परिसरात ही दरड कोसळली आहे.
मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. दरड कोसळल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.

सध्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू आहे. लवकर रस्ता मोकळा करू, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*