कन्नड संघटनेच्या नेत्याचा बेळगावात निषेध

0
बेळगाव / महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला, अशी मागणी करणार्‍या कन्नड संघटनेचा नेता वाटाळ नागराज याच्या वक्तव्याचा समितीने निषेध केला आहे.
संयुक्त महाराष्ट्र चौकात समिती कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वाटाळ नागराज याच्या प्रतिमेचं दहन केले. कर्नाटक सरकारने समितीवर कारवाई करावी आणि मराठीची मागणी करणार्‍यांची येथून हकालपट्टी करवी, असे वाटाळ नागराज म्हणाला.
बेंगळुरूहून आलेला कन्नड संघटनेचा वाटाळ नागराज आणि प्रवीण शेट्टी यांनी मूठभर कार्यकर्त्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोलीस संरक्षणात निदर्शने केली.

यावेळी आंदोलकांपेक्षा पोलिसांची संख्याच अधिक होती. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालावी आणि समितीच्या नेत्यांना तडीपार करावे, अशी मागणी त्याने केली.

येत्या 12 जूनला कर्नाटक बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही नागराज याने दिला. कन्नड संघटनेचा तथाकथित नेता वाटाळ नागराज याने महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घाला आणि समितीच्या नेत्यांना तडीपार करा अशी मागणी करून पुन्हा एकदा मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात आले तर त्यांना अटक झाली पाहिजे, असेही विधान वाटाळ नागराज याने केले आहे.

LEAVE A REPLY

*