पवारांचे नाव घेतल्याशिवाय महाजनांना झोप येत नाही

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांचा टोला

0

जळगाव । अजित पवारांनी गिरीश महाजन यांना कुठलेही आव्हान दिलेले नाही. गिरीश महाजन यांना ‘पवारमॅनिया’ रोग झाला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अजित पवार व शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप येत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी लगावला आहे. अजित पवारांचे आव्हान स्वीकारल्याचे गिरीश महाजन यांनी काल जाहीर केले होते. यावर अ‍ॅड. पाटील बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 13 फेब्रुवारी रोजी सरकारविरोधात दुपारी एक वाजता राष्ट्रवादी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जवाब दो निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात अ‍ॅड. पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात पाणी टंचाई व सिंचनाचे प्रश्न प्रलंबित असताना विकासावर बोलणे सोडून महाजन हे केवळ राजकीय स्टेटमेंट करून फुशारक्या मारत आहे.

सर्वत्र केवळ आपल्यालाच डिमांड आहे, असे ते दाखवत आहे. विरोधात असताना यांनी मोर्चे आंदोलने केली. आता मात्र शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या केवळ कागदोपत्री आहेत. हे विकास सोडून निव्वळ राजकारण करीत आहेत. दरम्यान, विरोधकांकडे विरोधक नसल्याचेही बोलण्यात आले.

मात्र उमेदवार असे जाहीर करायचे असतात का, असेही अ‍ॅड.पाटील म्हणाले. यावेळी महागनराध्यक्ष नामदेवराव चौधरी, ललित बागुल, कल्पना पाटील, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, नीला चौधरी, युवक अध्यक्ष अभिषेक पाटील, अरविंद मानकरी, सलीम इनामदार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*