सभागृहाबाहेरील चर्चेमुळे न.पा.ची सभा तीन दिवसांसाठी तहकूब

0

चाळीसगाव । दि. 9 । प्रतिनिधी :  चाळीसगाव नगरपरिषदेत सत्ताधारी नगरसेवकांना दुसर्‍या नगरसेवकाबद्दल आलेल्या खाजगी पत्रांचा मुद्दा उपस्थित करुन सभागृहात एका नगरसेवकाने वांदग निमार्ण केले. जवळपास दोन ते अडीच तास सभागृहात गोंधळ घातला जात असल्यामुळे शेवटी सभागृहाबाहेरील चर्चेला वैतागून नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी विषयपत्रिकेवरील विषयांशिवाय इतर विषयांवर चर्चा नको म्हणून न.पा.ची.सोमवारची सर्वसाधरण सभा तीन दिवसांसाठी तहकूब केली.

नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.11 रोजी नगरपरिषदेच्या सर्वसाधण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच भाजापाचे सत्ताधारी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांनी शविआ नगरसेवक सुर्यकांत ठाकुर यांच्यावर पॉस्को अतंर्गत गुन्हां दाखल असून फियार्ंदीच्या वडिलांचे नगरसेवकांना पत्र प्राप्त झाले आहे.

त्यामुळे सुर्यकांत ठाकुर यांना न्यायालय जोपर्यंत निर्दोष करत नाही, तोपर्यंत सभागृहात बसून देवू नये तसेच त्यांच्याबाबत ठराव करुन जिल्हाधिकारी यांच्या पाठवावा, अशी सुचना मांडली. परंतू यांंवर सत्ताधारी व विरोधी पक्षातील एकाही नगरसेवकांने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. नगरपरिषदेच्या प्रशासकिय कायद्यात ते बसत नसल्याचे शविआ आघाडीचे गटनेते राजीव देशमुख यांनी सांगीतले.

तसेच मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी देखील न.पा.च्या नियमावलीच्या पुस्तकातून दोषी ठरल्यावर पदमुक्त करण्याचा अधिकार असल्याबाबत खुलासा केला. तरी देखील घृष्णेश्वर पाटील यांनी सभागृहात याविषयावरुन तब्बल या विषयावरून दोन ते अडीच तास वेठीस धरुन, वांदग निर्माण केले.

शेवटी नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी हा विषय विषयपत्रिकेवर नसल्याचे सांगत व सभागृहातील गोंधळ पाहता सभा तीन दिवसांसाठी तहकूब केली. यावेळी दोन्ही गटनेत्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*