ईश्‍वरबाबूजी जैन यांच्यामुळेच पक्ष संपला – मनोज चौधरी

0
जळगाव |  प्रतिनिधी :  माजी खासदार ईश्‍वरबाबुजी जैन हे जामनेर तालुक्यात ‘मॅनेज’ झाल्याचा पलटवार मनोज दयाराम चौधरी यांनी पत्रकारपरिषदेत केला. दरम्यान ईश्‍वरबाबुजी यांनीच जिल्ह्यात राष्ट्रवादी संपविल्याचा आरोप देखील यावेळी केला.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार हे काल जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी अंजिठा विश्रामगृहात बैठक घेतली.

बैठकीत आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी करुन एकत्र राहण्याचा खा.पवार यांनी सल्ला दिला. परंतु खा.पवार जाताच दुसर्‍याच दिवसापासुन पक्षामध्ये वादविवाद सुरु झाले. काल झालेल्या बैठकीत ईश्‍वरबाबुजी जैन यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज चौधरी ‘मॅनेज’ झाल्याचे विधान केले होते.

यावर मनोज चौधरी यांनी आज पत्रकार परिषद घेवुन ईश्‍वरबाबुजी यांच्या विधानावर पलटवार केला. स्वतःच्या कार्यकर्त्याला सार्वजनीक जीवनातुन उठविण्याचे प्रयत्न करणारा नेता म्हणजे ईश्‍वरबाबु जैन हे आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जैन यांच्यामुळे पक्षात भांडण

ईश्‍वरबाबु जैन यांना राज्यसभेवर पक्षाने पाठविले. मात्र जैन यांनी पक्षातील नेत्यांमध्ये आपआपसात भांडणे लावून पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी आ.डॉ.सतिष पाटील, संतोष चौधरी यांच्यात भांडणे लावुन मुलगा मनिष जैन कसा श्रेष्ठ आहे असे पक्षश्रेष्ठींकडे भासवित होते. असेही मनोज चौधरी पत्रकार परिषदेत सांगितले.

ईश्‍वरबाबु जैन पक्षनिष्ठा गेली कुठे?

सुरेशदादा जैन यांच्या विरोधात मी स्वतः निवडणुक लढवुन दोन वेळा आव्हान दिले. ईश्‍वरबाबु जैन यांनी राष्ट्रवादी पक्षासह सुरेशदादांच्याही पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप देखील मनोज चौधरी यांनी केला.

तसेच निष्ठा तपासणारे जैन यांनी स्वतःच्या मुलाला पक्ष विरोधात राहुन विधानपरिषदेत निवडुण आणले तेव्हा त्यांची पक्षनिष्ठ गेली कुठे असा सवालही मनोज चौधरी यांनी उपस्थित केला.

मोरे काकांची ‘साठी आणि बुध्दी नाठी’

जैन व मारवाडी समाजाचे नेतृत्व हवे असे माजी खासदार वसंतराव मोरे यांनी काल खा.शरद पवार यांच्या समोर जाणीवपूर्वक सांगीतले. यावरुन मोरे काकांची ‘साठी आणि बुध्दी नाठी’ झाल्याचाही आरोप मनोज चौधरी म्हणाले.

LEAVE A REPLY

*