उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने संशोधन वृध्दी जोपासण्यासाठी उन्हाळी कार्यशाळा

0
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने संलग्नित महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या पदवी स्तरावरील विद्याथ्र्यांसाठी या वर्षापासून प्रथमच 1 ते 10 जून, 2017 या दरम्यान संशोधन वृध्दी जोपासण्यासाठी उन्हाळी कार्यशाळा (समर वर्कशॉप) आयोजित करण्यात आली आहे.
  कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या कल्पनेतून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने हा अभिनव उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. गुरुवार, दि. 1 जून रोजी सकाळी 10 वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.
ही कार्यशाळा भौतिकीयेशास्त्र प्रशाळेतील राजीव गांधी सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी कमिशन केंद्रात होणार आहे. या दहा दिवसाच्या कार्यशाळेत विद्याथ्र्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी तज्ज्ञांचे व्याख्यान, अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये प्रात्यक्षिक, विद्यापीठ आणि काही उद्योगांना भेटी, वौज्ञानिक चित्रपट दाखविणे अशा प्रकारचे उपक्रम राबविले जाणार आहेत.
बी.एस्सी. (द्वितीय) वर्षात शिकणाज्या विद्याथ्र्यांसाठी ही कार्यशाळा आहे. कार्यशाळेसाठी निवड झालेल्या विद्याथ्र्यांची निवास व भोजनाची व्यवस्था विद्यापीठाच्या वतीने  केली जाणार आहे.
  या दहा दिवसाच्या कार्यशाळेत डॉ.बी.एन.जगताप (मुंबई), डॉ.टी.व्ही.व्यंकटेश्वरन् (नवी दिल्ली), प्रा.एस. डी.ढोले (पुणे), डॉ.मिलिंद महाजन (अहमदाबाद), डॉ.इदगे (पुणे), डॉ.इरफाना बेगम (नवी दिल्ली), डॉ.अरुल प्रकाश (त्रिवेंद्रम्), डॉ.सतिष मोकाशी, डॉ.अनिरुध्द पेटकर (औरंगाबाद), डॉ.डी.जी.नाईक (पुणे), डॉ.रश्मी चावला (नवी दिल्ली) हे राष्ट्रीय पातळीवरील शौक्षणिक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच उद्योग जगतातील डॉ.किशोर ढाके, श्री.जौन,  के.बी.पाटील, डॉ.एन.पी.तेली हे विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतील. याशिवाय धनंजय जकातदार, प्रकाश पाठक, डॉ.विवेक काटदरे यांचे विद्याथ्र्यांना प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे, अशी माहिती या कार्यशाळेचे समन्वयक प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्रा.एस.टी.बेंद्रे आणि प्रा.डी.जी.हुंडीवाले यांनी दिली.

LEAVE A REPLY

*