मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक : मुंबईला जाणे टाळा

0
मुंबई : नवीन पादचारी पुलांच्या गर्डरच्या उभारणीसाठी उद्या दि. ४ रोजी मध्य रेल्वेच्या परळ करी रोडवर विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या आठ तासांपर्यत बंद राहणार आहेत. यामुळे उद्या दि. ४ रोजी प्रवाशांनी गैरसोय होऊ नये म्हणून मुुबईला जाणे टाळावे. किंवा अन्य पर्याय निवडावे असे रेल्वेच्या सूतांनी सांगीतले आहे.

या मेगा ब्लॉक दरम्यान दादरहून सीएसएमटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक सहा ते आठ तास पूर्णपणे बंद राहणार आहे.
पादचारी पूल उभारतांना या मार्गावरील विद्यूत पुरवठा सहा ते आठ तास बंद राहणार आहे.

हे काम रात्री करणे धोकेदायक असल्याने ते रविवारी कार्यालयाच्या सुटीच्या दिवशी करण्यात येत आहे. सीएसएमटीकडे जाणार्‍या सर्व लोकल या दादर व कुर्ला स्थानकापर्यतच चालविल्या जाणार आहेत.

येथून त्या पुन्हा ठाणे ,कल्याणच्या दिशेने सोडणार आहेत. त्यामुळे मुंबईला जाणार्‍या प्रवाशांना दादर ला उतरून तेथून सीटी बस, रिक्षा, टॅक्सीने पुढील प्रवास करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

*