कुंझर येथे दिराने भाऊजाईवर बलात्कार करून केले ठार

0
चाळीसगाव । प्रतिनिधी  :   तालुक्यातील कुंझर नात्याला कालीमा फासनारी घटना घडली आहे. 23 वर्षीय भाऊजाईवर तिच्याच सख्या दिराने बलात्कार करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा गळा दाबून खून केला.

हि घटना दि.3 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली असून सुरुवातील मेहुणबारे पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतू धुळे येथे मयत महिलेने श्वविच्छेदन केल्यानतंर तिच्यावर बलात्कार करुन, खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

प्रियंका तगरचन बैरागी(23) रा.कुंझर हिच्यावर मंगळवारी तिचा दिर प्रविण छगनदास बैरागी ह्याने बळजबरीने बलात्कारर केला. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा गळा दाबून खून करण्यात आला. त्यांच्या ह्या कृत्याला लीलाबाई छगन बैरागी रा.कुंझर व विमलबाई भिकन बैरागी रा.चिंचगव्हाण यांनी साथ दिली आहे.

मयत प्रियंगा हिचा पती तगरचन बैरागी हा आर्मीत नोकरीस आहे. प्रियंगा हिला एक मुलगा व एक मुलगी आहे. याप्रकरणी मयत प्रियंकाचा भाऊ विशाल गोकुलदास बैरागी रा.शिंदी ता.भडगांव यांच्या फिर्यादीवरुन प्रविण छगनदास बैरागी, लीलाबाई छगन बैरागी, विमलाबाई भिकन बैरागी यांच्या विरोधात भादवी कलम 302,376(1),34 प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहपोनि. श्री शिरसाठ करीत आहेत.

LEAVE A REPLY

*