चाळीसगावात ‘देशदूत’ च्या ‘जिजाऊ’ विशेष अंकाचे विद्यार्थींनीच्या हस्ते प्रकाशन

0

चाळीसगाव । दि. 12 । प्रतिनिधी : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतनिमित्नो जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी देशदूत काढलेल्या ‘जिजाऊ’या विशेष अंकाचे चाळीसगाव येथील य.ना.चव्हाण महाविद्यालयात आज संकाळी विद्यार्थींनीच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

प्रिया विजय पाटील, तेजस्वीनी विजय दाभाडे, लावण्या कैलास गावडे, गौवरी राजेंद्र जाधव आदि विद्यार्थींनीच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला.

यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थींनी उपस्थित होत्या, देशदूतच्या ‘जिजाऊ’ या विशेष अंकाचे विद्यार्थींनी वाचन करुन, अंक संग्रहीत ठेवण्यासारखा असल्याच्या भावना व्यक्त केल्यात. तसेच जिजाऊ विशेष अंकासोबत सेल्फी सुध्दा घेतली.

LEAVE A REPLY

*