Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

मिशन 2019 लोकसभा : पक्षातील निष्ठावांनापेक्षा भाजपा क्रिकेटर, अभिनेत्यांना देणार उमेदवारी

Share
नवी दिल्ली : आगामी 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणूकीत अनेक ठिकाणी भाजपाला विजयाची आशा धुसर होत आहे. 2014 मध्ये जिंकलेल्या जागा टिकवण्याचे भाजपापुढे मोठे आवाहन आहे. त्यामुळे निष्ठावांनापेक्षा क्रिकेटर  चित्रपटातील अभिनेते, अभिनेत्रींना उमेदवारी देण्याचा विचार भाजपात सुरू आहे.

राजकारणा बाहेरील चित्रपट कलावंत, क्रिकेटर यांना भाजपातर्फे उमेदवारी देत त्यांना स्टार प्रचारक करून निवडणूक जिंकण्याचा चंग भाजपा बांधत आहे. या बदल्यात चित्रपट कलावंत, क्रिकेटर यांना मंत्रीपद देण्यासह त्यांच्या वैयक्तीक व्यवसायात भली मोठी मदत करण्याचे आमिषही त्यांना देण्याचा विचार होत असल्याचे समजते.

चित्रपट कलावंत, क्रिेकेटर यासारख्या जनमानसावर कायम स्वरूपी प्रभाव असणार्‍या सेलिब्रेटींजना राजकीय आखाड्यात उतरवून त्यांच्या माध्यमातून जागा जिंकण्याचा राजकीय डावपेच भाजपा आखत आहे. यामुळे वर्षानुवर्ष भाजापशी निष्ठा राखणार्‍या व आमदार, खासदारकीची आणि मंत्रीपदाची अपेक्षा ठेवणार्‍या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, अक्षयकुमार, रवीना टंडन, अनुपम खेर, भप्पी लहरी, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, कपिल देव, माजी लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग अशा राजकारणाबाहेरच्या; पण जनमानसावर प्रभाव टाकू शकणाऱ्या सेलिब्रिटींना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याच्या पर्यायाची सध्या भाजपमध्ये गंभीरपणे चाचपणी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा खंदा समर्थक असलेला चित्रपटसृष्टीतील एक अनुभवी अभिनेता भाजपच्या वतीने या अभिनेत्यांशी संपर्क साधून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिल्ली, मुंबई, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशात २०१४ मध्ये मिळवलेल्या विजयाची यंदा पुनरावृत्ती होण्याची शक्यता धूसर असल्यामुळे भाजपने पुन्हा सेलिब्रिटींकडे मोर्चा वळवला आहे. दिल्लीत भाजपने गेल्यावेळी सातही जागा जिंकल्या होत्या; पण आता त्या कायम राखणे अवघड ठरणार असल्यामुळे चित्रपट कलावंत आणि क्रिकेटपटूंना मैदानात उतरवण्याचा विचार सुरू आहे. गौतम गंभीर आणि अक्षयकुमार यांना दिल्लीत, तर सेहवाग आणि कपिल देव यांना हरयाणातून उमेदवारी मिळू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हेमामालिनी, किरण खेर, परेश रावल, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, बाबूल सुप्रियो, मनोज तिवारी, ऑलिम्पिक रौप्यपदकविजेते राज्यवर्धन राठोड, माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांना मैदानात उतरवले आणि त्यांचा विजय निश्चित केला होता. बॉलीवूडचे कलावंत आणि क्रिकेटपटूंच्या साह्याने शहरी मतदारसंघांवर भाजपची पकड कायम ठेवण्याचा उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेमामालिनी, परेश रावल, किरण खेर, मनोज तिवारी, बाबूल सुप्रियो, व्ही. के. सिंह यांना पुन्हा उमेदवारी मिळणार हे स्पष्ट असले, तरी या वेळी काहींचे मतदारसंघ बदलले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बंडखोर शत्रुघ्न सिन्हांनी यंदा भाजपकडून लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!