एक जूनपासून शेतकरी संपावर : किसान क्रांती शेतकरी कृती समितीचे पारोळा तहसिलदारांना निवेदन

0
पारोळा | श.प्र. : येथील नायब तहसिलदार पंकज पाटील यांना शेतकरी संपाबाबतचे निवेदन किसान क्रांती शेतकरी कृती समिती पारोळा यांनी नुकतेच दिले. राज्यातील सर्व शेतकरी दि. १ जून पासून संपावर जाणार असल्याने शेतकर्‍यांच्या मागण्या व संपाबाबतचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.

गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ व शेतमालाला भाव न मिळणे त्यामुळे कर्जबाजारी शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याने आतापर्यंत अनेक शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत.

या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकर्‍यांना कर्जाच्या खाईतून सोडविण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांच्या समस्या समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी झोपी गेलेल्या शासन कर्त्यांना जागविण्यासाठी जगाचा पोशींदा असलेला शेतकरी राजा येत्या १ जून पासून संपावर जाणार आहे.

शेतकर्‍यांच्या मागण्यांमध्ये शेतकर्‍यांची सरसकट अल्प व मध्यम मुदत कर्जासह सर्व कर्जातून भुक्त करावी, स्वामिनाथन आयोगाचा शिङ्गारशी नुसार उत्पादन खर्चावर आधारीत ५० टक्के नङ्गा मिळावा, शेतीसाठी विविध दर वाढ करून व खोटी बिले पाठवून शेतकर्‍यांचे हाल करण्यापेक्षा सरसकट माङ्ग करावे व मोङ्गत विज द्यावी, ठिंबक व तुषार संचासाठी शंभर टक्के अनुदान मिळावे, साठ वर्षानंतर पेन्शन लागू करावी, दुधाला ५० रू. प्रतिलीटर भाव मिळावा, खतांची सबसीडी पुर्वीप्रमाणे सुरू करावी, किटक नाशकांच्या किंमतीवर निर्बंध आणावे आदी मागणी आहेत.

या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणणार नाही असा पावित्रा शेतकर्‍यांनी घेतला असून संपाबाबतचे निवेदन तहसिलदार यांना दिले आहे.

यावेळी जे.के.अण्णा पाटील, दौलतराव पाटील, सचिन पाटील, विक्रांत पाटील, गोपाल पाटील, संदीप पाटील, अमोल पाटील, गणेश पाटील, विजय पाटील, विनोद पाटील, प्रताप पाटील, लक्ष्मण पाटील, देविदास पाटील, सुदाम काटे, संजीव भोई, संजय पाटील, किरण पाटील, मोतीलाल पाटील, नरेंद्र शिंपी, संदीप बागडे, राजेंद्र मराठे, दामू खैरनार आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

*