उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आता अंतर्गत वाहतुकीसाठी विद्युत बस

0
जळगाव :  उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अपारंपारिक ऊर्जेचा वापर जास्त व्हावा या हेतूने कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी अनेक उपक्रम राबविण्याचे ठरविले असून त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठातील अंतर्गत वाहतुकीसाठी ब्ॉटरीवर चालणाज्या विद्युत वाहनाचा (बस) लोकार्पण सोहळा शुक्रवार, दि.12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून पार पडला.
  गतवर्षी या युवादिनाच्या निमित्ताने जुने बसस्थानक ते उमवि अशा शहर बस सेवेचा प्रारंभकरण्यात आला होता. तर आज विद्युत वाहनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठाने अपारंपारिक ऊर्जेवर भर देण्याचे धोरण अवलंबिले आहे. विद्यापीठाने कायनेटिक ग्रीन एनर्जी कंपनीकडून विद्युत वाहन खरेदी केले आहे.
 विनाइंधन असलेल्या या वाहनाच्या ब्ॉटरीचे चार्जिंग विजेवर होते. 14 आसन क्षमता असलेली ही बस  एकदा चार्जिंग केल्यानंतर 80  कि.मी. पर्यंत धावते.
    या लोकार्पण सोहळयाप्रसंगी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, व्यवस्थापन  परिषद सदस्य दिलीप पाटील,  प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव भ.भा.पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ.बी.डी.कज्हाड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा.ए.बी.चौधरी, प्रा.एस.टी.बेंद्रे, प्रा.ए.यु.बोरसे, प्रा.बी.व्ही.पवार, प्रा.एस.टी.इंगळे, प्रा.डी.एच.मोरे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.बेंद्रे यांनी वाहनाची माहिती दिली. विद्यापीठ परिसरातील विद्यार्थिनींसाठी  अंतर्गत वाहतुक या वाहनाद्वारे केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*