# युवादिन विशेष # शर्यत अजून संपलेली नाही……

0
आज १२ जानेवारी, अर्थात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ भोसले यांचा
जन्मदिवस. स्वामी विवेकानंद यांनी देशासाठी केलेल्या कार्याचे उत्तराई म्हणून राष्ट्रीय
युवा दिन म्हणून साजरा केला जातो. तर राजमाता जिजाऊंनी आपल्या सुसंस्कारांनी
आणि शिस्तीने छत्रपती शिवाजी महारांजासारखा तेजस्वी राजा घडविला.

मित्रांनो स्वामी विवेकानंद आणि शिवराय यांनी तत्कालीन राजकिय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती
पाहून वयाच्या सोळाव्या वर्षापासून देशाच्या सेवेत वाहून घेतले. अशा या स्वामी
विवेकानंद, राजमाता जिजाऊ आणि शिवराय यांचे मावळे म्हणून आपण आज मिरवून
घेत आहोत. ते आपले आराध्य दैवत आहेत. आपल्या प्रत्येकाच्या मनामनात ते भिनलेले
आहेत. असे असले तरी आपण त्यांनी दिलेल्या विचारांवर, त्यांनी घालून दिलेल्या
आदर्शांचा जीवनात अवलंब करतो का हा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होतो.

उठा, जागे व्हा आणि तोपर्यत थांबू नका जोपर्यत तुम्हाला लक्ष प्राप्त होत
नाही. असा संदेश स्वामी विवेकानंद यांनी समस्त युवा वर्गाला दिला आहे. स्वातंत्र्यपूर्व
आणि स्वातंत्र्योत्तर काळाचा इतिहास चाळला तर एक लक्षात येईल की. नविन काही
करण्याची धमक, नवइतिहासाची निमिर्ती करण्याची आंतरीक उर्मी येते ती याच वयात.
सोळा ते हातपाय थकेपर्यत सतत कार्यरत असतो तो युवा अशी नवी व्याख्या आता
करावी लागणार आहे.

कारण वयाच्या ८० व्या वर्षी विद्यापीठातून विद्यावाचस्पती  मिळणारे युवा वृध्द आहेत. तर आपल्या पतीला आजारातून बरे करण्यासाठी अनवाणी धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत पहिला क्रमांक मिळविणारी साठीतील युवती ही आपण  पाहीली आहे. यांच्यात मला विवेकानंद नी जीजाऊ दिसते.

बदलत्या काळासोबत अनेक बदल झालेत. अनेक महापुरूष आज देहाने नसले तरी
विचारांनी, त्यांच्या कार्याने आणि त्यांनी कृतीतून घालून दिलेल्या आदर्शाने शतकानुशतके
ते आपल्याला मार्ग दाखवत आहेत.

मित्रांनो जरा अंतमूख होऊन स्वत: स्वत:ला विचारा की. मी आज या कोणत्याही एका
थोर महापुरूषाचा एक तरी विचार स्व : इच्छेने स्वत:च्या जीवनात काटेकोरपणे अंमलात
आणतो का ? मित्रहो भारतात जेवढे धर्म आहेत, जातीपंथ आहेत त्या प्रत्येकातून एक
दोन तरी महापुरूष आहेत. त्या कोणाचा एक विचार जरी स्वत:हून अंमलात आणला
तरी मित्रहो आपले जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद या विचारात
आहेत.

महापुरूषांना कोणत्याही जातीपातीच, धर्मपंथांच बंधन नसते. आपणही ते लावू नये.
किंवा या धर्मातील महानपुरूष उच्चकोटीचे आणि ते कमी असा भेदाभेद त्यांनीही
पाळला नव्हता आणि आपणही तो पाळू नये. ज्याला जो महानपुरूष आवडतो त्याचे
त्यांच्या आचारविचार आणि आदर्शांचे पालन करावे. यात दुमत असू नये.

या सर्वांचे आदर्श, विचार आपणासमोर असतांनाही आपण ते केवळ प्रतिमा पुजनापुरताच
मर्यादीत ठेवत असल्याचे चित्र दिसत आहे. ही सर्व महानपुरूष निर्व्यसनी होती. नाही
म्हणायला त्यांना व्यसन होते ते फक्त निस्वार्थ देशसेवेचे. या देशातील जनता होय सर्व
सामान्य जनता तीचे भले कसे होतील. व्यक्तीगत आणि समाज म्हणून ज्या हानीकारक
प्रथा, परंपरा होत्या त्या त्यांनी बंद केल्यात. आजचा युवक पाहिला तर तो गुटखा,
सिगारेट, दारू यासारख्या अंमली पदार्थाच्या गर्तेत बुडाला आहे. वाढत्या वयाच्या
उन्मादात तो छेडखानी करण्यात स्वत:ला हिरो म्हणवून घेतांना दिसतो.

स्वातंत्र्य पुर्व,  स्वातंत्र्य आणि स्वातंत्रोत्तर काळात जी काही आंदोलने, चळवळी झाल्यात त्या या
युवकांच्यांच जोरावर. युवा शक्ती हीच देशाची खरी शक्ती आहे. आईवडीलांनी जन्म
दिला तो केवळ भौतिकवाद आणि चंगळवादात रममाण होण्यासाठी नव्हे. त्यांनाही वाटते
आपल्या अपत्याने या देशाचा एक चांगला सुसंस्कृत, जबाबदार नागरीक व्हावं. एक
चांगलं, आदर्श कुटूंब म्हणून त्याचे नी त्याच्यासोबत त्यांचेही नाव घेतले जाव. एवढीच
माफक अपेक्षा त्यांची असते. ती तरी आपण पूर्ण करतो का ? दूरचित्रवाणी आणि
स्वार्थी लोकांच्या विविध आमिषांना आपण बळी पडतो. एवढी का आपली सारासार
बुध्दी आपण गहाण ठेवतो ? मित्रांनो आपल्याला या जगात आणण्यापुर्वीपासूनच आपले
मातापिता आपली काळजी घेत असतात.

आपल्या अपत्यांच्या सुखासाठी ते किती त्रास सहन करत असतात. जन्मानंतरही ते अनेक बाबींचा आपल्या सुखासाठी ते त्याग करत  असतात. मी माझ्या लहाणपणी जे दु:ख सहन केलय,जो अपरिमित त्रास सहन केला ,जी
जीणं जगलोय तसे माझ्या अपत्यांच्या वाटेला येवू नये यासाठी ते किती कष्ट करतात.
स्वामी विवेकानंदांच्या घरची आर्थिक स्थितीही खूप चांगली होती. त्यांनाही मोजमज्जा
करता आली असती. परंतू देवाला नैवेद्य देण्यासाठी गेलेल्या नरेंद्रने (विवेकानंदांचे
बालपणीचे नाव ) दिलेला नैवेद्य दगडाची मुर्ती खात नव्हती म्हणून त्याच्या पायाशी डोके
आपटून प्राण त्यागणा-या नरेंद्राची ती अढळ भक्ती पाहून दगडालाही पाझर फुटला
आणि दगडाच्या मुर्तीतून परमेश्वराने प्रसाद ग्रहण केला.

मित्रांनो अशीच अढळ श्रध्दा आपल्या आईवडीलाप्रती ठेवा. कोणी फुकट देतोय म्हणून व्यसनांच्या आहारी जावू नका.  कोणत्याही आमिषाला बळी पडून अविचार करू नका. जीवनात यश आणि अपयश
हे दोन्हीही फार काळ टिकत नाही. यशाने हरळून जावू नका आणि अपयशाने खचून
प्रयत्न करणे सोडू नका. शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी अजून जिंकलेलो नाही. तूच आहे तुझ्या
जीवनाचा शिल्पकार. सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजीत नही, सत्यमेव जयते,
प्रामाणिकपणा हाच मोठा दागिणा आहे, जो कोणीही चोरू शकत नाही. त्यावर जेवढी
चिखलफेक कराल तेवढा तो अधिक प्रकाशमान होत असतो.

मित्रांनो आपण कोणत्याही महानपुरूषासारखे होऊ शकत नाही. परंतू त्यांच्या विचारांचे
सेवक तर निश्‍चीत होऊ शकतो. आणि नाहीच काही जमले तर मात्र एवढ नक्की करा
की आयुष्यात गुटखा, सिगारेट, दारू यांना कधीही स्थान देणार नाही. आयुष्यात कितीही
छोटा किंवा मोठा होऊ दे प्रामाणिकपणाची साथ कधी सोडणार नाही. भलेही ध्येयापासून
बाजुला व्हावे लागले तरी चालेल. आईवडीलांच्या कष्टांची, त्यांनी माझ्यासाठी पाहिलेली
स्वप्ने भलेही पूर्ण होणार नाहीत परंतू त्यांची राखरांगोळी होऊ देणार नाही. मित्रानो
आईवडीलांसारखे तुमचे उत्कृष्ट मित्र दुसरे कोणीच नाही.

तुमच्या सुखासाठी त्यांनी त्यांच उभ आयुष्य खर्ची घातलय. त्यांच्या वृध्दापकाळात त्यांना दोन घास सुखाचे द्या. नोकरी  व्यवसायासाठी घराबाहेर पडतांना वयोवृध्द आईवडील, भाऊ, बहिण, पत्नी, तुमची मुले
या सर्वाचा विचार करूनच वाहनाचा वेग ठेवा. तुमच्या आईवडीलांची स्वप्ने, तुमच्या
लाडक्या पत्नीची स्वप्ने, मुलांची स्वप्ने, तुमची लाखमोलाची साथ या सर्वांना हवी आहे.
त्यामुळे वाहन चालवतांना काळजीपूर्वक चालवा. तुम्ही एवढेही केले तरी तुम्ही जगाचा
नसला तरी तुमच्या परिवाराच्या दृष्टीने तुम्ही एक आदर्श ठराल. एवढे जरी केले तरी
स्वामी विवेकानंदाना अपेक्षित असलेला युवक तयार होईल.

तत्कालीन बिघडलेली स्थिती  पाहता स्वामी विवेकानंद यांनी त्या काळातील तरूणाईला आवाहन केले होते मला असे शंभर युवक हवेत आहेत की ज्यांच्या मदतीने मी या देशाचे भविष्य अधिक उज्वल
करेल. की या देशात पुन्हा सोन्याचा धुर निघेल. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपाण्
न्याय, समता, बंधुता या डॉ. बाबासाहेंबांच्या विचारांचा, स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा
स्वत : हून अवलंब करू तेव्हा.

आज विज्ञानाच्या प्रगतीने मानवी जीवन सुखी झाले आहे. मुलभ्ूत आणि भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करा. यश तुमचेच आहे. आजच्या युवा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

LEAVE A REPLY

*