अरुणभाई निस्वार्थ आणि पथदर्शी नेतृत्व – ना.देवेंद्र फडणवीस

0
चोपडा : राजकारणात अनेक लोक भेटतात त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. माझ्या जीवनात पेशन्स बाळगण्याची शिकवण पहिल्या भेटीत मला मिळाली ती अरुणभाई नगरविकास राज्यमंत्री असतांना.
ते अध्यक्ष असतांना भाषणांसाठी त्याचे मार्गदर्शन मिळाले. प्रसंगी उत्तम भाषणाचे कौतुकही प्राप्त झाले.लोकहितार्थ काम करण्याचा विचार करुन त्यांनी कार्य केले.

अरुणभाईंसारखी निस्वार्थ ,पथदर्शी व्यक्ती दुर्मिळ आहे.ते निव्वळ कर्तृत्वानेच नाही तर आचरणाने देखील मोठे आहेत.पीपल्स बॅकेचे देखील अमृत महोत्सवा निमित्त अभिनंदन करतो.असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यावेळी प्रास्तविक जिल्हा गौरव समितीतर्फेे अध्यक्ष आ.डॅा.सतिष पाटील यांनी करतांना आजचा डोळ्याचे पारणे फेडणारा समारंभ आहे.जिल्हा बॅक,शेतकरी अडचणीत आहे.खरिपाचा हंगाम जवळ आला आहे.तरी मुख्यमंत्र्यांनी पैसा उपलब्ध करुन देण्याची मागणी डॅा.पाटील यांनी  केली.

पीपल्स बॅक चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी बॅकेच्या कार्याचा आढावा घेतांना  १९३९ ला पीपल्स बॅंकेची सुरुवात स्व.प.पु.गोवर्धनदास भिकारीदास,माजी आ.मगनलाल गुजराथी यांच्या प्रयत्नांनी बॅक सुरू झाली.

बॅकेचे आज ७७ कोटींच्या ठेवी आहेत.सामाजिक कामांसाठी बॅकेने ट्रस्ट स्थापन करुन अनेक सामाजिक उपक्रम बॅकेने राबविले आहेत.अनेक जेष्ठ संचालक ,सभासदांच्या मार्गदर्शनाने बॅक गरुड भरारी घेत असल्याचे सांगितले.

हॅलीपॅडवर मुख्यमंत्र्यांचे स्वागत

हेलीपॅडवर ना.गिरिष महाजन,ना.गुलाबराव पाटील, खासदार रक्षाताई खडसे,आमदार हरिभाऊ जावळे,चंद्रकात सोनवणे,जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर,नाशिक विभागाचे आय.जी.विनय चौबे,जिल्हा पोलिस अधिक्षक दत्ता कराडे, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,सनी अलिझाड,भाजप तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके, घनःश्याम अग्रवाल,गजेंद्र जायस्वाल,आदी उपस्थित होते.त्यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांचे स्वागत केले.

अतिथींचे स्वागत करीत असतांना  माजी आ.डॅा.सतिष पाटील यांनी शरद पवारांचा सत्कार केला.तर मुख्यमंत्री ना.देवेद्र फडणविस यांचा सत्कार चंद्रहास गुजराथी यांनी केला.

तसेच मान्यवरांचे सत्कार आ.डॅा.सतिष पाटील, चेअरमन चंद्रहास गुजराथी, व्हा.चेअरमन प्रवीण गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी, बॅंकेचे अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष रमणलाल गुजराथी यांनी केले.

ना.चंद्रकांत पाटील

 कर्तृत्व आणि नम्रता दोन्ही गोष्टी अरुणभाईंच्यात पाहण्यास मिळातात. या दोन्ही गोष्टी एकत्रीत अभावानेच आढळतात.

ना.हरिभाऊ बागडे

 कर्तृत्ववान,निर्गवी,सालस अरुणभाई आहेत.त्यांचे सभागृहातील कामकाज करतांना अत्यंत सावधपणे समर्पक उत्तरे दिली.दुधाचा एक ब्राण्ड राज्यात आला पाहिजे. त्याबद्दल शरद पवार, मुख्यमंत्री फडणविस यांनी विचार करावा.दुग्ध व्यवसायामुळे आत्महत्त्या होत नाहीत.रोज पैसा उपलब्ध करणारा व्यवसाय आहे.

ना.रामदास आठवले

अरुणभाई, पूर्ण केलीली आहेत वर्षे पंच्याहत्तर,
मी शिंपडतो अत्तर,

अशी यमक साधणारी कविता सादर केली.एकमेकांच्या सुख दुखात सामील होण्याची शाहू,फुले, आंबेडकरांची परंपरा महाराष्ट्रात आहे.पवार साहेबांचे अरुणभाई अंत्यत विश्वासू सहकारी आहेत. त्यांना गव्हर्नर पद मिळू शकतं, पवार व पंतप्रधान  मोदीचे संबंध असल्याने मिळेल.अन्यथा तुम्हांला इकडे  यावे लागेल.

आपल्या सारख्या अभ्यासू माणसाची कदर व्हावी असे मला वाटते. आपल्या शताब्दीला सर्वजण हजर राहू.असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

ना.गुलाबराव पाटील

 कटुता आयुष्यात येवू देवू नये असा अरुणभाईंकडून आदर्श घेतला पाहिजे.विरोधकाला नामोहरम करण्याची,मैत्री जोडण्याची किमया त्यांच्याकडे आहे.निष्ठा राखल्याने राष्ट्रीय नेते याठिकाणी हजर राहिले यातच त्याचे मोठेपण दिसून येते.

सुशिलकुमार शिंदे

गाणं, शेरोशायरी,साहित्य यांचा संगम म्हणजे अरुणभाई, प्रकाशकांशीही त्यांचे संबध आहेत.चोपडा आणि अरुणभाई असे समीकरण आहे.त्याला महाराष्ट्रात मान्यता आहे.

साधी राहणी उच्च विचार सरणी अश्या संस्कारात वाढलेला हा नेता आहे.माणसं चुकतात आणि बरोबर होतात हे त्यांच्या जिवनातील गमक त्यांना यशाकडे घेवून जावू शकले.अरुणभाई जीवनाचे गाणे असेच गात रहा.

स्मरणिका प्रकाशन व चंद्रहास गुजराथींचा सत्कार

बॅकेच्या जेष्ठ सभासद मंगलाबाई भगवंतराव पाटील( मल्हारपूरा) यांचा सत्कार, तसेच कार्यक्रमाचे संयोजक रवी जैन यांचा सत्कार माजी  कृषीमंत्री शरद पवारांचे हस्ते करण्यात आला.तसेच अरुणभाई गुजराथींचे जेष्ठ बंधू विठ्ठलभाई व वसंतभाई यांचा शरद पवारांचे हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

शरद पवार

पुण्याच्या कॅामर्स महाविद्यालयात आमची पहिली भेट झाली.फरक एवढाच की अरुणभाई अभ्यास करत मी बाहेरचे संघटनांचे काम पाहयचो.स्वातंत्र्य काळात त्याग करणार त्यांच कुटुंब आहे.त्यांच्या कुटुंबाचा परिणाम आमच्यावर झाला.

पालिकेच्या कामकाजाचा आदर्श त्यांनी घातला.उद्याची दृष्टी असलेला समाजकारण आणि राजकारण करणारा अरुणभाईंसारखा नेता चोपडेकरांनी दिला.नगरविकास खात्याची जबाबदारी  पेलतांना स्वच्छ काम त्यांनी केलं.विधानसभाध्यक्ष असतांना त्यांनी समतोल राखून काम केल.सभागृह चालविण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला.

राष्ट्रकुल परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले त्याचा आनंद वाटला.अरुणभाई सत्तेत असोत वा नसोत पण समाजकारण करणारा माणूस त्यांचा आदर राहिल्या शिवाय राहणार नाही.

शेतीची अवस्था गंभीर आहे.नोटाबंदी केली आम्ही त्यांचे सोबत होतो.सहकारी बॅकांच्याे नोटा बदलवून मिळालेले नाहीत.जळगावातही मध्यवर्ती बॅंकेचे हेच हाल आहेत.बॅक व नागरिकांच्या नोटा रिझर्व बॅकेने बदलवून दिल्या नाहीत.तर कृषी कर्ज मिळणे दुरापास्त आहे.

या जटील प्रकरणाची लवकर तड लागली पाहीजे.पीपल्स बॅकेचे एन.पी.ए. शुन्य टक्के आहे.अरुणभाई मूळे येथील संस्था सुरळीत चालणार आहेत यात मला शंका नाही.नव्या पिढीकडे सर्व सुपूर्द केले पाहिजे.सल्लागार म्हणून काम केले पाहिजे.चांगल्या कामाची पावती मिळते गेल्या जन्मातील संचयी पुण्यामूळे कदाचित ते अरुणभाईंना प्राप्त झाले आहे.

अरुणभाई गुजराथी

आपण मागत नसतांना मिळालं आणि ते मला शरद पवारांनी मला दिल.कुटुंबाने पाठबळ दिल त्या स्वरूपात मला पवार साहेबांनी प्रेम दिलं.नगराध्यक्ष ते विधानसभाध्यक्ष,विठ्ठल मंदिराचे सभागृह ते इंग्लंड मध्ये कॅामन हॅाऊस पर्यत मला पवार साहेबांनी पोहचविले.

गावासाठी राबवण्याचे काम मी करीत राहिलो.रत्नावतीच्या महापूर प्रसंगी अठरा तासात मी कर्तव्य भावनेने परदेशातून धावून आलो.माझे जीवन एक पुस्तक आहे.आमचे चारच खासदार आहेत.पण साहेबांना विचारल्याशिवाय सरकारही चालत नाही. राजकारणात व्यापाराप्रमाणे कमी जास्त चालते.जगाला प्रेम देण्याचा संदेश साने गुरुजींनी दिला तो जीवनात पाळू या.

याप्रसंगी मंचावर पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील ,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,ना.रामदास आठवले,ना.गिरिष महाजन,ना.गुलाबराव पाटील,विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी विधानसभाध्यक्ष दिलिप वळसे पाटील,आमदार एकनाथराव खडसे,हरिभाऊ जावळे,चंद्रकांत सोनवणे,राजुमामा भोळे,संजय सावकारे,चंदुलाल पटेल,खा.रक्षा खडसे,माजी आमदार डॅा.सुरेश पाटील,  जगदीश वळवी,राजवर्धन कदमबांडे, अरुण पाटील दिलिप वाघ,प्रा.दिलिप सोनवणे,रमेश शेंडगे,रमेश चौधरी,मनिष जैन,कविवर्य ना.धो.महानोर,माजी खासदार गुणवंतराव सरोदे,वसंतराव मोरे,ईश्वरलाल जैन,डॅा.उल्हास पाटील,माजी मंत्री विजय पाटील, गुलाबराव देवकर, अमरिष पटेल,जिल्हा कॅाग्रेसाध्यक्ष संदीप पाटील,डॅा.ए.जी.भंगाळे,पणन महासंघाचे अध्यक्ष रवींद्र पाटील,नगराध्यक्ष मनीषा चौधरी,उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख, गटनेते जीवन चौधरी,महेश पवार, चोसाका चेअरमन निता पाटील, कृउबा सभापती जगन्नाथ पाटील, शेतकी संघाध्यक्ष सदाशिव पाटील, सूतगिरणीचे व्हा.चेअरमन पी.बी.पाटील,यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुधीर गाडगीळ यांनी केले.बुरसे बंधू (नाशिक) यांच्या राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

*