वांजोळ्यात १५ लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन

0
भुसावळ | प्रतिनिधी :  तालुक्यातील वांजोळा येथे आमदार विकास निधी अंतर्गत मंजूर १५ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आ.संजय सावकारे याच्या हस्ते  करण्यात आले.

वांजोळाचेे सरपंच नरेंद्र पाटील यांच्या प्रयत्नाने आमदार विकास निधी अंतर्गत १० लाखांच्या सांस्कृतिक हॉल(सभामंडप), ५ लाखांच्या शुद्ध पेयजल यंत्रणा (आरओ प्लँट), भुसावळ-वांजोळा-गोंभी रस्त्यांचे डांबरीकरण कामांचे भूमीपूजन करण्यात आले.

तसेच सरपंच नरेंद्र पाटील यांचे धाकटे बंधू स्व. सचिन पाटील यांच्या स्मरणार्थ बसस्थानकावरील मोफत जलसेवा (पाणपोईचे) उद्घाटन आ.संजय सावकारे, जि.प. सदस्या पल्लवी सावकारे, पं.स.सभापती सुनील महाजन, उपसभापती मनीषा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रसंगी आ.सावकारे यांनी शेत शिवार शेतकर्‍यांशी संवाद साधून शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यात निलगाई (लोधडे), जंगली स्वापदांकडून पीकांची होणारी नासाडी टाळण्यासाठी शेतीसाठी कंपाऊंड उभारण्यास शासनाकडून ५० टक्के अनुदान मिळण्याची मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात आली.

मागणी शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्‍वासन दिले. तसेच शेत रस्ते, गावजवळ नदीला पुर आलस पुलावर पाणी असल्याने नवीन पुलाची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

यावेळी उपसरपंच देविदास सावळे, ग्रा.प. सदस्य विनोद सोनवणे, संगीता तायडे, मंदार पाठक, गोजोरा सरपंच शिवाजी पाटील, भालचंद्र पाटील, नारायण कोळी, गजु भारंबे, प्रविण पाटील, रमेश पाटील, सुधाकर पाटील, उखा मोरे, चांगो तायडे, बन्सीलाल दोडे, मुकुंदा सावळे, संजय तायडे, एकनाथ भिल, राजु भील, दीपक भिल, विशाल मोरे, जगदीश दोडे, योगेश पाटील, कृष्णा बावस्कर, स्वप्नील पाटील, सागर पाटील, जिवराम सावळे, ग्रामसेवक आनंदा सुरवाडे, ऍड हरिश पाटील, ज्ञानेश्‍वर मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रामाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. पंकज पाटील यांनी मानले.यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*