‘कॉमन बर्ड मॉनेटरींग’ उपक्रमांतर्गत १४ पासून भारतभरात एकाचवेळी होणार पक्षी गणना

0
जळगाव |  प्रतिनिधी  :  बीएनएचएसच्या मकॉमन बर्ड मॉनेटरींग प्रोग्रॅमअंतर्गत १४ ते २१ जानेवारी या कालावधीत हिवाळी पक्षी गणना घेण्यात येईल. ही गणना भारतभर एकच वेळी घेतली जाईल.

गणना रोज सकाळी ७ ते ९ या दोन तासात केली जाणार आहे. या गणनेत जळगाव शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांनी, पक्षी मित्र व संघटनांनी तसेच प्राध्यापक, संशोधकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संशोधक सहाय्यक किशोर दुधे, जिल्हा समन्वयक प्रा.राजेंद्र गाडगीळ, अनिल महाजन यांनी केले आहे.

पक्षी तज्ज्ञ राजेंद्र गाडगीळ

 

वाढते शहरीकरण, जंगल तोड, वृक्ष तोड, शेत जमिनींवर वाढती घरबांधणी, तलाव, नद्या खाड्या हे पाणवठे प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत तर काहित भराव टाकून बुजवणे सुरु आहे. त्यामुळे पक्ष्यांची संख्या व प्रजाती नष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षी गणना करण्याची गरज आहे.

पक्षी गणना सातत्याने केल्याने जो अहवाल हाती येईल त्यामुळे पक्ष संवर्धन व अधिवास रक्षणाची नीती व धोरण ठरवता येईल असे प्रा. राजेंद्र व शिल्पा गाडगीळ यांनी सांगितले.

जिल्ह्यातील नागरिकांनी ‘सिटिझन्स सायन्टीस्ट’ म्हणून सहभाग घ्यावा, नागरीकांना आपल्या गच्चीवरून, परस बागेतील अथवा परिसरातील पक्ष्यांची गणना करता येईल असे सांगून राजेंद्र व शिल्पा गाडगीळ म्हणाले कि हि पक्षी गणना शास्त्रीय पद्धतीने व ट्रांझिट लाईन पद्धतीचा वापर करून करण्यात येईल आहे.

ज्यांना या गणनेत सहभाग घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपले नाव आपल्या गणनेचे ठिकाण गाडगीळ यांना कळविण्याचे आवाहन केले असून यातून सहभागी व्यक्ती संस्थंना ग्रीड देता येईल.

LEAVE A REPLY

*