राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ग्राहक, शेतकर्‍यांना अपमानास्पद वागणूक

0
पाचोरा | प्रतिनिधी :  शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ग्राहकांना व शेतकर्‍यांना बँकेतील अधकारी व कर्मचार्‍यांकडून अपमानास्पद वागणूक देण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

या प्रकारामुळे बँकांचे ग्राहक व शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजी पसरत असून अशा उर्मट अधिकार्‍यांकडून ग्राहकांना दिल्या जाणार्‍या अपमानास्पद वागणूकीकडे शाखा व्यवस्थापकांसह वरिष्ठ अधिकार्‍यांकडून तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने पाचोरा शहर व तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षकांच्या वागणूकी बद्दल प्रचंड चिड निर्माण होवू लागली आहे.

पाचोरा शहरातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकेत दैनंदिन व्यवहार करणारे हजारोंच्या संख्येत ग्राहक आहेत. तसेच विविध शासकिय योजनांची कामकाज, कर्जप्रकरणे, शेतकरी कर्ज, सोन तारण कर्ज, पगार, पेन्शन, चलन भरणा आदी व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना शहरातल्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये यावे लागते.

असे असतांना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये येणार्‍या ग्राहक, शेतकरी, विद्यार्थी यांना बँकांमधील बेजाबबदार व उर्मट अधिकार्‍यांकडून ग्राहकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.

हा प्रकार पाचोरा येथील भारतीय स्टेट बँक शाखेत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या बँकेचे व्यवस्थापक यांच्या दालनात उपलब्ध होत नाही. अन्य कॅबीनमध्ये बसून कामकाज करतात. कर्मचार्‍यांकडूनही ग्राहकांना चांगली वागणूक दिली जात नाही.

स्टेट बँक शाखा पाचोरा येथील ऋण अधिकारी शेतकर्‍यांना आरेरावीची भाषा वापरुन बँकेबाहेर हाकलून लावण्याची भाषा करीत असल्याने वाडी-शेवाळे (ता.पाचोरा) येथील प्रगतशील शेतकरी डिगंबर पाटील यांनी संबंधीत अधिकार्‍यांची रिजनल आङ्गिसर जळगाव व डेप्युटी जनरल मनेजर औरंगाबाद यांचे कडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

वाडी-शेवाळे ता.पाचोरा येथील वनश्री तथा प्रगतशील शेतकरी डिगंबर नथ्थू पाटील यांनी स्टेट बँक शाखा पाचोरा कडून गेल्या ८ वर्षापूर्वी १० लाख रुपये गृह कर्ज घेतले आहे. त्याच प्रमाणे डिगंबर पाटील यांनी याच बँकेतून २ लाख ५० हजार रुपये पिक कर्ज ही घेतले आहे.

पाटील यांना १० लाखाच्या गृह कर्जासाठी प्रत्येक वर्षी ५ हजार ३०० रुपये हप्ता भरावा लागतो. त्यांचे स्टेट बँक शाखेत बचत व कृषी कर्ज आसे दोन वेगवेगळे खाते असून गेल्या वर्ष भरापासून गृह कर्ज अधिकारी निलेश राणे हे डिगंबर पाटील यांच्या बचत खात्यातून ५ हजार ३०० रुपये व कृषी खात्यातून ५ हजार ३०० रुपये असे १० हजार ६०० रुपये हप्ता कपात करीत आहेत.

श्री पाटील यांनी गृह कर्जापोटी आपण ५ हजार ३०० रुपये ऐवजी १० हजार ६०० रुपये कपात करीत आहात असे निलेश राणे यांच्या कडे तोंडी व लेखी निवेदने देवून लक्षात आणून दिले.

दरम्यान बँकेने कपात केलेले एक वर्षापासूनचे डबल हप्ते मला परत द्या किंवा पुढील एक वर्षापर्यंत गृह कर्जाचा ५ हजार ३०० रुपयाचा हप्ता कपात करु नका, अशी विनंती करण्यासाठी गेलेल्या डिगंबर पाटील यांना गृह कर्ज अधिकारी निलेश राणे यांनी समाधान कारक उत्तर न देता उलट अरेरावीची भाषा वापरुन मी तुमचे खात्यातुन जे डबल पैसे कपात केले ते माझ्या घरात आले आहे का ? तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत.

माझी कुणाकडेही तक्रार करायची असेल तर खुशाल करा. माझे काही एक वाकडे होणार नाही. अशा शब्दात सांगून अरेरावीची भाषा वापरली व बँकेच्या बाहेर हाकलून लावले.

निलेश राणे यांच्या बाबतीत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. यामुळेच डिगंबर पाटील यांनी त्यांचे संदर्भात असिंसन्ट जनरल मनेजर (जळगाव) व डेप्युटी जनरल मनेजर (औंरगाबाद) यांचेकडे लेखी तक्रार केली आहे.

LEAVE A REPLY

*