एका बटाट्यापासून ४० दिवस मिळेल वीज ?

0
जेरूसलेम | वृत्तसंस्था :  जगभरातील लोकांच्या आहारात ठाण मांडून बसलेला बटाटा सर्व प्रकारच्या भाज्यांबरोबर जसा गुण्यागोविंदाने नांदतो तसाच तो रासायनिक क्रियेतही आनंदाने समाविष्ट होऊ शकतो.

इस्रायलच्या संशोधकांनी म्हटले आहे की, बटाट्याच्या मदतीने तुम्ही मोबाईल ङ्गोन चार्ज करू शकता, त्याचबरोबर एक लहानसा बल्बही चालवू शकता आणि तब्बल ४० दिवस हा बल्ब प्रकाशही देऊ शकतो.

हा दावा जेरूसलेमच्या हिब्रू युनिव्हर्सिटीचे राबिनोविच यांनी केला आहे. एलईडी बल्ब एका बटाट्याच्या मदतीने चालू शकतो आणि तोही तब्बल चाळीस दिवसांपर्यंत प्रकाश देऊ शकतो.

उकळलेल्या बटाट्याला चार-पाच तुकड्यांत कापा आणि त्यात तांब्याची तार आणि झिंकची प्लेट एकत्र करून त्याला कनेक्टरच्या मदतीने एलईडी बल्ब जोडा. या प्रयोगानंतर एलईडी बल्ब सुरू होईल. उकडलेल्या बटाट्याने ऊर्जा तब्बल १० पटीने वाढेल म्हणजेच वीज बनविण्याचा खर्च कमी होईल.

एका बटाट्याने निर्माण होणारी विजेसाठी लागलेला खर्च हा विकसनशील देशात वापरण्यात येणार्‍या तेलापेक्षाही स्वस्त आहे. बटाट्यात असणारे जस्त आणि तांबं यांच्यात रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन एक पदार्थाहून दुसर्‍या पदार्थाकडे घेऊन जाते त्यामुळे ऊर्जा निर्माण होते.

LEAVE A REPLY

*