अहिराणी भाषेत संशोधन करणार्‍यांना शिष्यवृत्ती

0
पुणे |  वृत्तसंस्था :  अहिराणी भाषेवर जे विदयार्थी संशोधन, पीचडी करतील, त्यांना राज्य सरकारच्यावतीने शिष्यवृत्ती दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक, तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका आणि खान्देश अहिराणी कस्तुरी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथील लांडगे सभागृहात पाचव्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरूवात अहिराणी गाण्याने करण्यात आली. यावेळी कलाकारांनी या गाण्यावर नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

यानतंर विनोद तावडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी तावडे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करण्यार्‍या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन निकाळजे, आदी मान्यवर उपस्थित होते.

अहिराणी भाषा मराठीला समप्रमाणात साजेशी अशीच आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, मालेगाव या भागात या भाषेवर प्रेम करणारे लोक आहेत. पण ही भाषा मूळ मराठी साहित्यात आणली पाहिजे, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे.
ही भाषा अधिकाधिक वृध्दिंगत व्हावी यासाठी या समाजातील मान्यवरांसोबत मंत्रालयात एक चर्चासत्र आयोजित केले जाईल आणि त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी योग्य ती पावले उचचली जातील, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

*