खडसेंप्रमाणे महाजनांचीही चौकशी झालीच पाहीजे : आ.डॉ.सतीश पाटील यांची पत्रपरिषदेत माहिती

0
जळगाव  प्रतिनिधी :  राज्य शासनाने दाऊद संभाषण प्रकरणी जशी आ. एकनाथराव खडसेंची चौकशी केली तशीच चौकशी आता जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांचीही झालीच पाहीजे अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील यांनी आज पत्रकार परीषदेत दिली. दरम्यान शेतकर्‍यांप्रती शिवसेना दुटप्पी भुमिका मांडत असल्याची टिकाही त्यांनी केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परीषदेत जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावरही दाऊद संबंधाचा आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु ते कधीही सिध्द झाले नाही.

त्यानंतर माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्यावरही दाऊद संभाषणाचा आरोप करून ज्यानी रान पेटविले तेच आता दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात जात आहे. असे असतांना लग्नाबाबत आपल्याला माहिती नाही असे वक्तव्य ना. गिरीष महाजन यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्याने करणे हे दुर्दैव आहे.

त्यामुळे खडसेंप्रमाणे त्यांचीही चौकशी झालीच पाहीजे अशी मागणी आ. डॉ. सतिष पाटील यांनी केली.

दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दि. १० जुन रोजी वर्धापन दिन आहे. त्यानिमीत्ताने दि. ४ ते १० जुन या कालावधीत स्वाभीमान सप्ताह राबविला जाणार आहे. सप्ताहात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जाणार असुन तालुकानिहाय झेंडावंदन केले जाणार आहे.

शिवसेनेतर्फे साजरा केला जात असलेला भगवा सप्ताह म्हणजे दुटप्पी भुमिका असल्याची टिकाही आ. डॉ. सतिष पाटील यांनी केली. एकीकडे सत्तेत रहायचे आणि विरोधात असल्यासारखे वागायचे हे योग्य नाही.

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना जर स्वाभिमान असेल तर त्यांनी सत्तेतुन बाहेर पडावे असे आव्हान त्यांनी दिले.

 

LEAVE A REPLY

*