जळगावातील महिलेचा स्वाईन फ्ल्युनेे मृत्यू

0
जळगाव |  प्रतिनिधी  : जळगाव शहरातील अक्सानगर भागातील सेवानिवृत्त महिला शिक्षिकेचा औरंगाबाद येथील खाजगी हॉस्पिटल येथे स्वाईन फ्ल्युने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना  घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तब्बसुम जहॉं मोहम्मद हानिफ वय ६६ असे मयत महिलेचे नाव आहे. सुरवातीला या महिलेवर जळगाव येथील रुग्णालया उपचार सुरु होते. परंतु निदान न झाल्याने नातेवाईकांनी महिलेला उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल केले होते.

गेल्या १५ दिवसंापासून या महिलेवर उपचार सुरु होते. आज या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. औरंगाबाद येथील रुग्णालयाने तब्बसुम जहॉं मोहम्मद हानिफ यांचा स्वाईन फ्ल्युने मृत्यू झाला असल्याचे कारण स्पष्ट केले आहे.

दरम्यान स्वाईन फ्ल्युच्या आजाराचे पसरु नये यासाठी प्रशासनाने दक्षता घेवून याबाबत जनजागृती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*