चाळीसगावला झालेल्या तलवार हल्यात एकाचा मृत्यु : आरोपींच्या अटकेसाठी पोलीस स्टेशनवर जमाव

0

 

 चाळीसगाव | प्रतिनिधी  : शहरात दोेन गटात पूर्ववैमस्यातून शुक्रवारी जबर हाणामारी झाली होती. यात एकावर तलवार व कोयताने सपासप वार करण्यात आले. तर दोन जण किरकोळ जखमी झाले होते.
शुक्रवारी रात्री गंभीरित्या जखमी मुन्ना शाह (वय अंदाजे ४४) यांचा दरम्यान धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला. यामुळे वातावरण तापले आहे.

शनिवारी संकाळी १० वाजेच्या सुमारास शाह परिवारातील नातेवाई व समाज बांधवाचा पोलीस स्टेशनवर २०० ते ३०० लोकांचा जमाव चालुन आला.

पोलीसांनी कारवाईत केलेल्या दिरंगाईमुळे पोलीसांवर त्यांनी रोष व्यक्त केला तसेच अटकेत असलेल्या दोन आरोपीना ताब्यात देण्यंाची मागणी करत होते.

यावेळी परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे पोलीसांनी तात्काळ रॉपिड ऍक्शन फोर्सची तुकडी मागविली होती. दरम्यान आज दि.२७ रोजी दुपारी मृत मुन्ना शाह यांची अंत्ययात्रा निघणार असल्यामुळे शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*