जे.टी.महाजन अभियांत्रिकीत विद्यार्थ्यांनी घडवले पारंपारीक वेशभूषेचे दर्शन

0

न्हावी, ता.यावल । वार्ताहर : जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नेहसंमेलन उत्सव 2019 निमित्त पारंपारिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

पारंपारिक दिवस हा भारतीय संस्कृती दर्शविणारा दिवस असून या दिवशी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या संस्कृतीनुसार वेशभूषा परिधान करून आले होते आणि त्यांच्याकडून हा दिवस पारंपारिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्ग ग्रुप, शिव प्रतिष्ठान ग्रुप, रायझिंग स्टार ग्रुप, ओरिसा ग्रुप, मंगळागौरी ग्रुप, प्लेयर अननोन बॅटल ग्राऊंड ग्रुप, इंडियन आर्मी ग्रुप इत्यादीनी सादरीकरणातून आपआपला परिचय दिला.भारत हा विविध संस्कृतीचा देश असल्यामुळे देशाची एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला पाहिजे असा सूर विद्यार्थ्यांमधून वक्त करण्यात आला होता ,त्यानुसार हा पारंपारिक दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डॉ.के. जी .पाटील व स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.डॉ.एच. पी. बेंडाळे यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा.पी .पी. ठोंबरे, प्रा.एम. जी. भंडारी, प्रा.मोहिनी चौधरी यांनी सहकार्य केले. यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक ,प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*