Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

लोकसभेच्या एका सदस्यासाठी 71.29 लाख तर राज्यसभेच्या सदस्यासाठी 44 .33 लाख रूपये खर्च

Share
नवी दिल्ली : लोकसभेच्या एका सदस्यासाठी सरासरी 71.29 लाख रूपये खर्च होत आहेत. तर राज्यसभेच्या सदस्यासाठी सरासरी 44.33 लाख रूपये खर्च केला जात आहे. गेल्या चार वर्षात खासदारांच्या पगार व इतर भत्त्यांंपोटी सरकारी तिजोरीतून तब्बल 1 हजार 997 कोटी रूपये खर्च झाले आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ता चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारात ही माहिती मिळविली आहे.

लोेकसभा व राज्य सभेचे सदस्य मिळविणारे हे कोट्याधिश आहेत. असे असतांना त्यांना शासकीय मानधन, पेन्शन, शासकीय सुविधांचा मोह सुटत नाही. सामान्य जनतेला गॅसवरील सबसिडी सोडण्याचा आग्रह पंतप्रधान नरेद्र मोदी मन की बात मध्ये सांगत असतांना मात्र त्यांच्याच सरकारमधील मंत्री, खासदार यांच्यांवर मात्र शासकीय तिजोरीतून पैशांची उधळपट्टी करतांना दिसत आहे.

शासकीय तिजोरीत जमा होणारा पैसा हा सामान्य जनतेच्या करातून जमा झालेला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी प्रथम त्याच्या सरकारमधील मंत्री, खासदार यांच्यावर शासकीय सुविधांची व पैशांची होणारी उधळपट्टी बंद करावी अशी मागणी आता भारतीयवासीयांकडून होत आहे.

2014 पासून तर आजपर्यंतच्या या चार वर्षात लोकसभा सदस्यांना पगार व भत्त्यांसाठी 1 हजार कोटी रूपये देण्यात आले आहेत. यानुसार एका सदस्यांवर सरासरी 71 लाख 29 हजार 390 रूपये खर्च केले जात आहेत. तर राज्य सभा सदस्यांच्या पगार व भत्त्यांसाठी 443 कोटी रूपये खर्च केले आहे. त्यानुसार एका सदस्यांवर 44 लाख 33 हजार 682 रूपये खर्च होत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!