कठोर पाऊल उचलण्याची गरज

0
पाकिस्तानने काश्मीर खोर्‍यात भारताविरोधात छुपे युद्ध सुरू केले आहे. पाकिस्तानातील दहशतवादी कॅम्पवरील ड्रोन हल्ले अमेरिकेच्या मदतीने वाढवण्याची गरज आहे.

काश्मीर खोर्‍यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कारवाई करावीच लागेल; पण पाकिस्तानात जाऊन याविरुद्ध युद्ध पुकारावे लागेल.

गेल्या काही दिवसांत काश्मीर खोर्‍यात घडलेल्या घटना तीन भागात पाहता येतील. काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केलेल्या वृत्तानुसार हुर्रियतचे शबीर शहा यांना पाकिस्तानकडून सर्वाधिक आर्थिक मदत मिळते. अलीकडेच त्यांना ७५ लाख रुपये मिळाले होते.

तेच पैसे दगडफेक करणार्‍यांना दिले जात होते तसेच इतर कामांसाठी वापरले जात होते. दगडफेक करणार्‍यांना पैसे द्यावे लागतात तसेच काश्मिरात प्रसिद्ध होणारी वर्तमानपत्रे, सोशल मीडिया साईटस् चालवण्यासाठीही या पैशाचा वापर केला जातो. म्हणून सरकारने एक महिन्यासाठी सर्व सोशल मीडिया साईटस् बंद केल्या आहेत.

एवढेच नव्हे तर अनेक हुर्रियत नेत्यांच्या बँक खात्यातून हवाला पद्धतीने येतो त्यांच्या खात्यावरही बंदी घालण्यात येत आहे.

युद्धात चुकीची माहिती पसरवण्यासाठी पाकिस्तानी टीव्ही, लोकल टीव्ही ऑपरेटर्स मोठा हातभार लावत आहेत. काश्मिरात उग्रवाद वाढवण्यात या माध्यमांची मोठी मदत मिळते.

त्यावरसुद्धा आता बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान टीव्ही, सौदी अरेबियन वाहिन्या आणि स्थानिक वाहिन्या यांनी अनेक वर्षांपासून काश्मीर खोर्‍यात प्रचंड प्रमाणात विष पसरवण्यात हातभार लावला होता.

थ्रीजी आणि ङ्गोरजी इंटरनेट सेवेमुळे दहशतवाद्यांनी तयार केलेले व्हिडीओज सर्वदूर प्रसारित केले जातात. सध्या काश्मीर खोर्‍यात व्हिडीओ चित्रङ्गितींचे युद्ध केले जात आहे. दहशतवादी त्यांच्या कृत्याचे समर्थन करण्यासाठी रोज अनेक व्हिडीओ लोकांसमोर आणतात. त्याला खूप प्रसिद्धीही मिळते.

एका दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेला आलेल्या इतर दहशतवाद्यांनी त्याला एके ४७ ने ङ्गायरिंग करून सलामी दिली. या व्हिडीओला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तर दुसर्‍या व्हिडीओत दहशतवादी काश्मिरी तरुणांची डोकी पाण्यात बुडवत होती, कारण ते सैन्य किंवा पोलीस यामध्ये भरती होण्यास गेले होते.

ज्यांना ज्यांना शक्य आहे असे मध्यमवर्गीय काश्मिरी युवक-युवती काश्मीर खोरे सोडून इतर भागात जात आहेत. महाराष्ट्रातही काश्मिरी युवक मोठ्या प्रमाणात नोकरी आणि शिक्षण दोन्हीसाठी आलेले दिसतात. विविध चित्रफितींच्या माध्यमातून सुरू असलेले सोशल युद्ध थांबवण्याची नितांत गरज आहे.

गेल्या काही आठवड्यांत १३ बँकांना लुटून ९० लाखांहून अधिक पैसे चोरी करण्यात आले. म्हणूनच बँका बंद करून स्वतःचे रक्षण करत आहेत.

दहशतवाद्यांची संख्या किती ?

गुप्तचर विभागाच्या अंदाजानुसार काश्मीर खोर्‍यातील दहशतवाद्यांची संख्या २०० च्या आसपास असावी. यामधले ७० ते ८० टक्के दहशतवादी काश्मीरमधील आहेत आणि २० ते ३० टक्के हे पाकिस्तान आणि इतर देशातून आलेले आहेत. काश्मीर खोरे सोडून उर्वरित काश्मीरमध्ये ५०-६० एवढेही दहशतवादी नसावेत.

पहिल्यांदा काश्मीर खोर्‍यात हिंसाचार करणारे दहशतवादी आसपासच्या जंगलामध्ये, डोंगरात लपून बसलेले असायचे. ङ्गक्त कोणतेही दुष्कृत्य करण्याच्या वेळी काश्मीर खोर्‍यामध्ये यायचे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून त्यांनी काश्मीरच्या लहान लहान गावांमध्ये राहणे सुरू केले आहे.

म्हणूनच सैन्याने काही दिवसांपूर्वी एक अभियान राबवून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही आठवड्यांत काश्मिरी पोलीस आणि अर्धसैनिक दल यांच्या शस्त्रांची लूट केली गेली आणि काही दहशतवादी काश्मीर खोर्‍याच्या रस्त्यांवर खुलेआम ङ्गिरताना दिसत आहेत. म्हणूनच दहशतवादविरोधी अभियानाचा वेग वाढवून जास्तीत जास्त दहशतवाद्यांना पकडण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.

त्याशिवाय काश्मीरच्या इतर भागात म्हणजे लेह लडाख, उधमपूर भागात पर्यटनाला चालना देण्याची आवश्यकता आहे जेणेकरून रोजगारनिर्मिती होईल. बेरोजगार काश्मिरी युवक या भागात जाऊन आपल्या पोटापाण्याची सोय करू शकतील.

येत्या काही महिन्यांत काश्मीरमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि अपप्रचारामुळे युद्ध छेडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात हिंसाचाराला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल.

हे सर्व पाकिस्तानच्या मदतीने होत आहे. पाकिस्तानसंदर्भात अनेक घटना घडत आहेत. त्याचा वापर आपण करून घेतला पाहिजे. इराणमध्ये पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. त्याविषयी इराणने पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

इराणही भारताप्रमाणे पाकिस्तानवर सर्जिकल ऍटॅक करेल, असा इशारा पाकिस्तानला दिला आहे. इराण-पाकिस्तान वादाचा वापर आपण करू शकतो. पाकिस्तानी सीमेवरील दहशतवादी कॅम्पची माहिती देऊन असे हल्ले करण्यास आपण इराणला मदत केली पाहिजे. एवढेच नाही तर सध्या अङ्गगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान युद्धच सुरू आहे.

अङ्गगाणिस्तान सैन्याने पाकिस्तानात प्रवेश करून अनेक दहशतवाद्यांना मारले असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून अङ्गगाणिस्तानात पाकिस्तानचे नियंत्रण असणारी तालिबानी राजवट असावी, असा पाकिस्तानचा प्रयत्न आहे.

मात्र अङ्गगाणिस्तानच्या नेतृत्वाला हे मान्य नसल्याने दोन्ही देशांच्या सीमा अशांत आहेत. एक महत्त्वाची घटना म्हणजे अङ्गगाणिस्तानकडून पाकवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी पाकिस्तानने सीमेवर भारताप्रमाणेच तारेचे कुंपण बांधायला सुरुवात केली आहे.

म्हणूनच अङ्गगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यानच्या युद्धात अङ्गगाणिस्तानला मदत करून पाकिस्तानला असुरक्षितत वाटावे, अशी परिस्थिती निर्माण करण्याची गरज आहे.

चीन-पाकिस्तान आर्थिक परिक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत ग्वाडार बंदर ते चीनच्या शिन जियांग प्रांत असा ४५०० किलोमीटरचा रस्ता तयार केला जात आहे. तिथे ६० अब्ज डॉलर्स खर्च करून हा रस्ता आणि आजूबाजूच्या भागाचा विकास करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

परंतु या योजनेविरोधात पाकिस्तानात प्रचंड प्रमाणात राग आहे. कारण या प्रकल्पांतर्गत चीन त्यांच्याकडील जुनाट तंत्रज्ञान पाकिस्तानात पाठवत आहे. पाकिस्तानात वीज तयार करून चीन ती विकत घेणार आहे. कोळसा वापरल्यामुळे पाकिस्तानातील पर्यावरणाचे अतोनात नुकसान होणार आहे.

इतकेच नव्हे तर पाकिस्तान यामुळे कर्जबाजारी होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी जनतेत या रस्त्याविरोधात रोष आहे. याचा वापर करून आपण पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आघात करण्याची गरज आहे.

येत्या काही काळात हिंसाचाराला उत्तर देण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणेने सजग राहिले पाहिजे. पाकिस्तानने काश्मीर खोर्‍यात भारताविरोधात छुपे युद्ध सुरू केले आहे. तसेच अङ्गगाणिस्तान, इराण यांच्या मदतीने भारताने पाकिस्तानविरोधात छुपे युद्ध पुकारले पाहिजे.

त्याशिवाय अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी पाकिस्तानात आश्रयासाठी आला आहे. जसे अमेरिकेने ओसामा बिन लादेनविरोधात पाकिस्तानात घुसून कारवाई केली होती अशीच कारवाई पुन्हा एकदा पाकिस्तानात करावी यासाठी अमेरिकेवर दबाव आणला पाहिजे.

दहशतवाद्यांना बरबाद करण्यासाठी एमओएबीचा वापर अङ्गगाणिस्तानच्या गुहांवर केला होता तसाच वापर पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर केला पाहिजे.

पाकिस्तानातील दहशतवादी कॅम्पवरील ड्रोन हल्ले अमेरिकेच्या मदतीने वाढवण्याची गरज आहे. म्हणजेच काश्मीर खोर्‍यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी खोर्‍यात कारवाई करावीच लागेल.

पण पाकिस्तानात जाऊन याविरुद्ध युद्ध पुकारावे लागेल. सर्वच स्तरांवर छुप्या युद्धाचा मुकाबला केल्यास पुढील काही आठवड्यात काश्मीर खोर्‍यात शांतता प्रस्थापित नक्कीच शक्य होईल.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

LEAVE A REPLY

*