मेहुणबारे येथील बालिकेच्या अपहरणाचा तपास शुन्य : माता-पित्याचे पो.स्टे.मध्येच विष प्राशन

0
मेहुणबारे / चाळीसगाव | प्रतिनिधी :  अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलिस अपयशी ठरल्याने तिच्या आई-वडिलांनी मेेहुणबारे पोलिस स्टेशनसमोर विष प्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी धुळे सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. अचानक विष प्राषण केल्यामुळे पोलीसांची दमछाक उडाली आहे.

शेख शोएब हा तरूण दि.३ एप्रिल १७ रोजी अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून घेवून गेला आहे. ५० दिवसांहून आधिक काळ होवूनही शेख शोएब परत आला नाही.

याप्रकरणी पोलिसात शेख शोएब याचेविरुद्ध मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू पोलिसांना त्यांना शोधण्यात अपयश आले. हा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा आरोप मुलीचे वडील राजेंद्र नागो राजपूत यांनी केला असून त्यांनी तशी तक्रारदेखील दिली आहे.

शोएबच्या आई- वडिलांचे तसेच काकाचे त्यास सहकार्य आहे. त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान तपासकामी पोलिसांचे सहकार्य नसल्याचे मुलीच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

आतापर्यंत अनेकदा निवेदने देऊनही उपयोग न झाल्याने आत्मदहन करण्याचा इशारा संबंधिताना निवेदनाद्वारे मुलीच्या आईवडिलांनी दिला होता. यामुळे २६ रोजी सकाळपासून पोलिस स्टेशनसमोर तगडा बंदोबस्त ठेवला होता.

मात्र पोलिसांना हुलकावणी देत मुलीचे वडील राजेंद्र नागो राजपूत व आई निर्मला राजेंद्र राजपूत या दोघांनी किटकनाशक घेऊन २६ रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान पोलिस स्टेशनसमोरच विष प्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी त्यांना लगेच अटक करुन उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले. प्रकृती जास्त खालावल्याने धुळे जिल्हा रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*