पूर्ववैमनस्यातून एकावर तलवार हल्ला : चाळीसगाव येथील घटना : काकाची प्रकृती गंभीर, पुतण्या जखमी

0
चाळीसगाव | प्रतिनिधी :  शहरात दोेन गटात पूर्ववैमनस्यातून हाणामारी झाली. पुतण्याला दवाखाण्यात भेटण्यासाठी गेलेल्या काकावर तलवार व कोयत्याने सपासप वार करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. तर दोन जण किरकोळ जखमी झाले.

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होेते. घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील हंस टॉकीजनजीक असलेल्या अनिल नगरातील मिर्झा व शहा कुटुंबात वाद झाला. रेल्वे स्टेशनजवळील मशिदीत आशफाक शहा (वय २५) हा दुपारी २ वाजता नमाज पढण्यासाठी जात होता. वसीम सैय्यद याकुब याच्याशी त्याचा वाद झाला. दोघा गटाचे साथीदार त्या ठिकाणी जमा झाले. त्यांच्यात वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.

यात आशफाक व वसीम सैय्यद हे दोघे जखमी झाले. दोघा शहरातील वाय.पी.हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले. या प्रकरणी लगेच दुपारी २ वाजता पोलिस स्टेशनला माहिती कळविण्यात आली. पोलिसांच्या दोघा गटाची समजूत काढली.

जखमी असलेला आशफाक शहाचे काका सलीम शहा गुलाब शहा (वय ५०) त्याला भेटण्यासाठी दवाखान्यात आले. भेट घेऊन ते परत ते घरी जात असतानाच मिर्झा गटातील १० ते १२ जणांच्या टोळक्याने दुपारी ४ वाजता सलीम शहा यांना शिवाजी चौक ते उन्नती मंडळ (करगाव रोड) या दरम्यान गाठले.

त्यांना दुपारी झालेल्या वादाबाबत जाब विचारले. व लगेचच शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. तलवार, कोयता व हॉकी स्टीकने शहा यांच्या शरीरावर सपासप वार केले. यात शहा यांच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली. तसेच डोक्यातूनही रक्तस्त्राव सूरू होता.

या प्रकराने रस्त्यावरील नागरिक सैरावैरा पळत सुटले. मारहाण करणारे टोळके तेथून पसार झाले. त्यांनाही वाय.पी.पाटील हॉस्पिटललाच दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीने धुळे येथे हलविण्यात आले. डॉ.अभिजीत पाटील यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले.

पोलीसांचा हलगर्जीपणा

पोलीसांना घटना घडण्याची पूर्वी किरकोळ वादाची पूर्व कल्पना पोलीसांना देंण्यात आली होती. पोलीसांनी दोन्ही गटाची समजुतही काढली होती. परंतू वेळीच कडक भूमीका न घेतल्यामुळे मिर्झा गटातील टोळक्यांनी शहा गटातील एकावर तलवारीने वार केला आहे. पोलीसांच्या हलगर्जीपणामुळेच आरोपीनी एकावर तलवार हल्ला केल्याचे दिसून आले.वेळीच आरोपींच्या मुसक्या आवळल्या असत्या तर हि घटना घडली नसती अशी चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

*