अशोक चव्हाण यांना दिलासा

0

मुंबई । टू-जी घोटाळ्यात मोठा दिलासा मिळाल्यानंतर काँग्रेससाठी आणखी एक खूशखबर आहे. आदर्श घोटाळ्या प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली परवानगी अखेर उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस सरकारला झटका बसला असून चव्हाण यांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.

याआधी अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध खटला चालवण्याकरिता तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मंजुरी नाकारली होती. मात्र फेबुवारीमध्ये राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली.

त्याला चव्हाण यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रणजित मोरे यांच्या खंडपीठाने याविषयी सुनावणी पूर्ण केल्यानंतर आपला निर्णय राखून ठेवला होता. तो आज सुनावण्यात आला.

राज्यपालांनी राजीनामा द्यावा
मला न्यायव्यवस्थेवर विश्वास होता आणि आज सत्य बाहेर आले. आदर्श घोटाळ्याचे आरोप हे माझ्याविरोधात रचण्यात आलेले राजकीय षडयंत्र होते. आदर्शप्रकरणी राजकीय हेतूने प्रेरित होऊन राज्यपालांनी माझ्याविरोधात चौकशी करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे असा निर्णय घेणार्‍या राज्यपालांनी राजीनामा द्यायला हवा.
– अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

LEAVE A REPLY

*