Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

चाळीसगाव गायत्री कॉम्प्लेक्समध्ये ‘गुडमॉर्निंग’ प्रेमीयुगलांचा सुळसुळाट?

Share
चाळीसगाव । प्रतिनिधी :  शाळा, कॉलेज, महाविद्यालय व बस स्टँन्ड यांच्या अगदी हाकेच्या अतंरावरील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेेले गायत्री कॉम्प्लेक्स (प्लाझा) हे सध्या प्रेमी युगालासाठी संकाळी भेटण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

दररोज संकाळी येथे प्रेमीयुगल एकमेकांची गळाभेट घेतांना व आश्लिल वर्तन करताना आढळून येतात. प्रेमीयुगलांच्या गैर वर्तनामुळे येथील व्यापार्‍यांना रोजच त्रास सहन करावा लागत आहे. संकाळी भेटण्यासाठी येणार्‍या ह्या गुडमॉर्निंग प्रेमीयुंगलांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गायत्री कॉम्प्लेक्सच्या जवळपास दोन किलो मिटरच्या अतंरावर शाळा, कॉलेजस, महाविद्यालय व झोेपडपट्टी देखील आहे. तसेच बस स्थानक हे दोन मिनिटीच्या अतंरावर आहे. शहरासह तालुक्यातून कॉलेजसाठी तरुण व तरुणी कॉम्प्लेक्सच्या आजुबाजूच्या शाळा, कॉलेजसमध्ये शिक्षण घेण्यसाठी दरारोज येतात. ग्रामीण भागातील विद्यार्थीं व विद्यार्थींनीही पहाटेच्या बसने गावातून येथे पोहचतात.

कॉम्प्लेक्स जवळ असल्यामुळे अनेक प्रेमीयुगल कॉलेज किवा महाविद्यालयात न जाता सकाळी पहिले गायत्री कॉम्प्लेक्स हजेरी लावतात. सकाळी 6 ते 8 ह्या वेळेत मनमोकळ्या गप्पा मारतात. प्रसंगी एकमेकांना आलींगन दिल्यानंतर पुढे मार्गस्थ होतात. तर काही जण येथील मुतारी, गच्चीवर जाऊन आश्लिल चाळे करतात. तसेच काही जण रात्रीच्या वेळी येथे मध्यपान करतात.

याठिकाणी बर्‍याचदा काँडमचे खाली पॉकीट, बियरच्या फुटलेल्या बॉटल्स आढळून येतात. यात शहरासह ग्रामीण भागातील प्रेमीयुगालांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कॉम्प्लेक्समधील व्यापार्‍यांना दररोज याचा प्रत्यय येत असून अशा प्रेमीयुंगला हटकल्यास ते उलट व्यापार्‍यांशी वाद घालून हामरी तुमरीवर येतात.

अल्पवयीन प्रेमीयुंगालाचे प्रमाण जास्त

कॉम्प्लेक्सपासून जवळच शाळ व कॉलेज असल्यामुळे येथे भेटण्यासाठी येणार्‍या अल्पवयीन प्रेमीयुंगालाचे प्रमाण जास्त आहे. काही प्रेमीयुगल संकाळच्या सत्रात येथे भेटण्यसाठी येतात, तर काही दुपारच्या सत्रात येथील जिन्यांचा उपयोग भेटण्यासाठी करतात. दररोज अशा अल्पवयीन प्रेमीयुगलाना व्यापार्‍याना कॉम्प्लेक्सच्या बाहेर काढावे लागते.

पालकांनी लक्ष देण्याची गरज

शाळा, कॉलेज व शिकवणीचे नाव करुन, विद्यार्थ्यीं घराच्या बाहेर पडतात, परंतू शाळा किवा कॉलेजच तास बुडवून ते येथे तांसतास गप्पा मारतात व इतर उद्योग करतात, त्यामुळे आपला पाल्य दिवसभर काय कारतो, कुठे जातो, याबाबत पालकांनी जागरुकता ठेवली पाहिजे. तसेच शाळा, कॉलेजात जाऊन विचार पूस देखील केली पाहिजे.

निर्भया पथक गेले कुठे?

विद्यार्थ्यीनी व इतर तरुणीची छेड काढणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी चाळीसगाव पोलिसांकडून काही दिवसांपूर्वी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली होती. परंतू महिनाभरानतंर हे पथक गायब झाले. शहरातील गायत्री कॉम्प्लेक्ससह अनेक ठिकाणी प्रेमीयुंगालसह इतर जोडप्यांचे गैरप्रकार सर्रास सुरु असतात. अशा प्रेमीयुगालचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांच्या गस्तीपथक किवा निर्भया पथकांची नेमणूक करण्याची आवश्यकता असल्याचे मागणी होत आहे.

त्वरित बंदोबस्त करावा
गायत्री कॉम्प्लेक्स येथे नेहमीच प्रेमीयुंगलाचा वावर असतो. त्यामुळे कॉम्प्लेक्सचे नाव खराब होत आहे. तसेच व्यापार्‍यांना देखील नेहमीच त्रास होता. प्रेमीयुंगालाचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा हिच अपेक्षा आहे.
– मनोज माने, व्यावसायीक

व्यापारावर परिणाम
कॉम्प्लेक्समध्ये येणार्‍या प्रेमीयुगलांमुळे सर्वसामान्य लोक येथे येण्यास धजावत नाही. त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. तसेच प्रेमीयुगलास हटकले, तर ते आरेरावी करतात. प्रेमीयुगालाचा वावर बंद करण्यासाठी त्वरित उपाय करण्यात यावे.
– गोपाल कापडणे, व्यावसायीक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!