ग्लोेबल पुलोत्सव # अभिवाचन, एकपात्री , सुगम गायन व वाद्य वादनाविष्कारात रंगले विद्यार्थी

0

जळगाव । प्रतिनिधी : विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित ‘ ग्लोबल पुलोत्सवा’च्या तिसर्‍या दिवसाचे पहिले सत्र अभिवाचन, एकपात्री प्रयोग, सुगम गायन व वाद्य वादनाच्या कलाविष्कारांनी गाजलेे.

विवेकानंद प्रतिष्ठानच्या विविध शाळांमधील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यासाठी या स्पर्धा घेण्यात आल्यात.

ग दि माडगूळकर रंगमंच

गीत गायन स्पर्धा व वाद्य वादन स्पर्धा पार पडल्या यात जळगाव जिल्ह्यातील एकूण 70 विद्यार्थ्यांचा सहभाग होता गीत गायनाचे परीक्षक म्हणून  श्रीमती सुदीप्त सरकार आकाशवाणी कलाकार व मा सौ पदमजा नेवे प्राचार्य गोदावरी संगीत महाविद्यालय यांची उपस्थिती होती परिक्षककांचे स्वागत व्यवस्थापन मंडळ सदस्य  रत्नाकर गोरे यांनी स्मृतिचिन्ह व पुष्पचिन्ह देऊन केले सूत्रसंचालन सौ शुभदा नेवे,सौ कविता सुर्यवंशी यांनी केले या प्रसंगी किरण सोहळे उपस्थित होते.

सुधीर फडके रंगमंच

अभिवाचन स्पर्धा पडली यात जळगाव जिल्ह्यातील एकूण 30 गटांचा सहभाग होता अभिवाचनाचे परीक्षक म्हणून खान्देश लायब्ररी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप देशमुख व स्त्री रोग शल्यचिकित्सक डॉ  मुकुंद करंबेळकर यांची यांची उपस्थिती होती परिक्षककांचे स्वागत व्यवस्थापन मंडळ सदस्य  रत्नाकर गोरे यांनी स्मृतिचिन्ह व पुष्पचिन्ह देऊन केले सूत्रसंचालन सौ स्मिता चव्हाण ,सौ मंजुषा भिडे यांनी केले परीक्षकांचा परिचय सौ स्वाती बेंद्रे यांनी केला या प्रसंगी किरण सोहळे उपस्थित होते.

आर के लक्ष्मण रंगमंच

पु ल देशपांडे ,सुधीर फडके, आणि ग दि माडगूळकर यांच्या व्यंगचित्र स्पर्धा पडली यात जळगाव जिल्ह्यातील एकूण 125 विद्यार्थ्यांचा सहभाग होता व्यंगचित्र स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राचार्य ललित कला महाविद्यालयात चे प्राचार्य राजेंद्र महाजन व प्रसिद्ध चित्रकार राजू बाविस्कर आणि प्रमुख पाहुणे म्हणून  मार्मिक साप्ताहिकाचे कार्टूनिस्ट  डॉ आशिष विखर यांची उपस्थिती होती परिक्षककांचे स्वागत  पद्माकर इंगळे यांनी केले सूत्रसंचालन व परिचय  नितिन सोनवणे यांनी केला या प्रसंगी किरण सोहळे व सर्व विवेकानंद प्रतिष्ठान चे सर्व कलाशिक्षक यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*