गावात भजन कीर्तन बंद ; बोरगाव ग्राम पंचायतीचा अनोखा ठराव

0
वाशिम / बोरगाव ग—ाम पंचायतने एक अनोखा निर्णय घेतला आहे. ग—ामीण भागात कीर्तन, भजन अंधश्रद्धेच्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च केले जातात आणि गावाचा विकास होत नाही.
मात्र हे कार्यक्रम बंद करण्याचा ठराव पारित करून गावाच्या विकासावर भर देण्याचा ठराव बोरगावच्या ग—ामस्थांनी मंजूर केला आहे.
मालेगाव तालुक्यातील बोरगाव हे 1 हजार 600 लोकसंख्येचे गाव आहे. या गावात दरवर्षी कीर्तन, सप्ताहावर लाखो रुपये खर्च केले जायचे.
हा अनाठायी होणारा खर्च कमी करून या पैश्यांवर गावात झाडे लावून झाडे जागवण्याची शपथ गावकर्‍यांना देण्यात आली.

राज्यातील ग—ामीण भागात मोठ्याप्रमाणावर सप्ताहावर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र बोरगाव येथील ग—ामस्थांनी एकत्र येत या सर्व गोष्टींना फाटा देत गावात ग—ामगीता वाचन आणि शेतकरी कार्यशाळा घेऊन संकटात असलेला शेती व्यवसाय फायद्यात कसा आणता येईल असे कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यापुढे दरवर्षी एक हजार झाडे लावून ती जगवण्याचा निर्धारही ग—ामस्थांनी केला.

आजही राज्यभरात शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि ग—ामीण भागात कीर्तन भजन आणि अंधश्रद्धेच्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च केले जातात.

याच गोष्टीला फाटा देत बोरगावच्या गावकर्‍यांनी घेतलेला निर्णय इतर गावांना प्रेरणा देणारा ठरेल.

LEAVE A REPLY

*