रुग्णालयात जन्मताच आधार नोंदणीची सोय !

0
मुंबई / राज्यातील 3600 अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि 500 ग—ामीण रुग्णालयांना जून महिन्याअखेर ङ्गटॅबफ देण्यात येणार आहेत.
त्या माध्यमातून पाच ते 18 आणि शून्य ते पाच वयोगटातील बालकांच्या आधार नोंदणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. ग—ामीण रुग्णालयात आता जन्मताच बालकांच्या आधार नोंदणीचे काम राज्यभर सुरू होणार आहे, असे मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांनी सांगितले.

राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्य सचिवांनी संवाद साधत विविध कामांचा आढावा घेतला.

राज्यातील 18 वर्षे वयोगटावरील लोकसंख्येची आधार क्रमांकाची नोंदणी पूर्ण झाली आहे. मात्र शून्य ते पाच आणि पाच ते 18 या वयोगटातील सुमारे 63 लाख 30 हजार जणांचा आधार नोंदणी होणे बाकी आहे.

त्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत जूनअखेर 4000 ङ्गटॅबफ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 3600 ङ्गटॅबफ राज्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिकांना वाटप करण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून आता अंगणवाडीस्तरावर आधार नोंदणीची मोहीम अधिक गतिमान होणार आहे.

राज्यातील 500 ग—ामीण रुग्णालयांना आता टॅब देण्यात येणार असून त्यामुळे जन्मताच बालकांची आधार नोंदणी करणे शक्य होणार आहे, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*