धावत्या रेल्वेगाडीवर दगड मारल्यास जन्मठेपेची शिक्षा होणार

0
मुंबई / धावत्या रेल्वेवर दगड मारल्यामुळे प्रवासी, लोको पायलट, मोटरमन किंवा सुरक्षारक्षक जखमी झाल्यास दगड मारणार्‍याला रेल्वे नियमानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
रेल्वे प्रशासनानं दगडफेक करणार्‍या समाजकंटकांवर यापुढे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदवले जातील असं म्हटलं आहे.
लोहमार्गालगतच्या झोपड्यांमधून किंवा लोहमार्गाच्या बाजूला वावर असलेले समाजकंटक धावत्या रेल्वेवर दगड भिरकावतात.

मागील काही महिन्यांमध्ये असे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे प्रवासी, मोटरमन, सुरक्षारक्षक किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील लोको पायलट जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत.

जानेवारी 2017 ते मे 2017 या कालावधीत पशषचम रेल्वेमार्गावर असे 34 प्रकार घडले. दगड भिरकावणारा माथेफिरु किंवा समाजकंटक दोषी ठरल्यास रेल्वे नियमानुसार त्याला प्रसंगी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

LEAVE A REPLY

*