जालन्यात चालत्या गाडीत चालकाला हार्टअटॅक

0
जालना / जालना-औरंगाबाद रोडवर बदनापूरजवळ चालत्या गाडीत चालकाला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाले.
अपघातातील जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून या जखमींना औरंगाबादमधील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे.

आज सकाळी औरंगाबादहून चिखलीला निघालेले क्रूझर वाहनाचे चालक खंडू तोतमल यांना वाहन चालवताना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटलं आणि दुभाजकाला जोरदार धडक बसून अपघात झाला.

या अपघातात वाहन चालक खंडू तोतमल यांचा मृत्यू झाला.

क्रूझर गाडीतील इतर 9 जण जखमी झाले. सर्व जखमी एकाच कुटुंबातील असून ते एका विवाहसोहळ्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे जात होते.

LEAVE A REPLY

*