सुट्टीत आजीकडे आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

0
पुणे / पिंपरीतील अजमेरा कॉलनी येथे आजीकडे राहण्यास आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
यातील धक्कादायक बाब ही की, हा प्रकार तब्बल एक महिन्याने उघडकीस आला आहे. यातील सातपैकी तीन आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
सौरभ शेट्टी, नसीब खान, हर्षल भाटिया असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

अजमेरा कॉलनी येथे सुट्टीसाठी ही तरुणी आजीकडे आली होती. शेजारी राहत असलेल्या तरुणाशी ओळख झाली होती. हा तरुण तिला एक दिवस फिरायला घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने तिला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर ही माहिती त्याने त्याच्या इतर तीन मित्रांना दिली. या तिघांनी तिथे येऊन तिच्यावर बलात्कार केला. या तीन मित्रांच्या ओळखीने अन्य मुलांनी ही बलात्कार केला.

या सर्व प्रकारातून तरुणी आजारी पडली. त्यामुळे आजीने तिला नेरळला तिच्या गावी नेऊन सोडले. घरच्यांनी तिला रुग्णालयात नेले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर 25 मे रोजी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा गुरुवारी मध्यरात्री पिंपरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

*