नवर्‍याला घाबरविण्यासाठी तिने केला आत्महत्येचा दिखावा

0
डोंबिवली / शोलेमधील धर्मेंर्द्रचा सुसाईड सीन सगळ्यांना माहीत असेल. डोंबिवलीत असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला.
नुकतचं लग्न झालेल्या जोडप्यात भांडणाची ठिणगी पडली आणि तिने बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन आत्महत्या करण्याचा दिखावा केला. मात्र, तिच्या पतीने आणि नातेवाईकांनी तिला बोलण्यात गुंतवून तिला आत खेचलं.

पोलीस ठाण्यात तिची चौकशी केल्यानंतर तिने पतीला घाबरविण्यासाठी हा सगळा स्टंट केल्याचं सांगितलं.

एकमेकांवर प्रेम जडल्यानंतर, दोघांनी लग्न केलं आणि लग्नाला सहा महिने उलटल्यावर दोघांमध्ये भांडण होण्यास सुरुवात झाली.

बुधवारी पुन्हा दोघांमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार भांडण झालं, आणि हाच राग मनात धरून तिनं हे कृत्य केल्याचं मान्य केलं.

LEAVE A REPLY

*